एक्स्प्लोर

Video: शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले; जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलवरुनही सुनावले

काशी येथे काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील पुणे अपघात आणि मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही भाष्य केले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक आणण्यात येणार असल्याच्या चर्चेवरुन महाड येथे निषेध आंदोलन केले. मनुस्मृती पुस्तके फाडून आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर हे आंदोलन केले होते. मात्र, मनुस्मृती पुस्तकं फाडत असताना त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडला गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाजपने आव्हाडांच्या या कृतीविरोधात आज राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. तर, उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही आव्हाडांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, शालेय अभ्यासक्रमात कुठेही मनुस्मृतीचा श्लोक आणला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

देवेंद्र फडणवीस वाराणसी दौऱ्यावर असून उत्तर प्रदेशात 7 व्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचारासाठी ते पोहोचले आहेत. काशी येथे काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील पुणे अपघात आणि मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही", असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, शालेय अभ्यासक्रमातील मनुस्मृती श्लोकाच्या सहभागावरही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, मी काशीत प्रचाराला नाही तर लोकांचा उत्साह पाहायला आलो आहे. काशी येथे आपण प्रचाराला आलेलो नाही, त्याची गरज सुद्धा नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिग्विजयात मराठी माणसाचा इतका मोठा सहभाग आहे, याचा मला आनंद आहे, असेही फडणवीसांनी काशीतून बोलताना म्हटले. 

मनुस्मृतीच्या श्लोकावर फडणवीसांचे भाष्य

कुठल्याही अभ्यासक्रमात कुठेही मनुस्मृतीचा श्लोक घेण्याचा विचारदेखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी केलेला नाही, कधीही आलेला नाही, त्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही, असे म्हणत फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच, त्यांनीच ही चर्चा आणली, त्यांनीच आंदोलन केले आणि जेव्हा खोटं आंदोलन करताना माणूस कसं काम करतो, हे आंदोलन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी फाडला. पण, महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.

आव्हाडांनी मागितली माफी

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आंदोलनादरम्यान झालेल्या कृतीवरुन भाजप आक्रमक झाले असून राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात जितेंद्र आव्हाडांचा फोटो फाडला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आव्हाड यांची बाजू मांडली. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही देखील आव्हाड यांची पाठराखण केली. तर, जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेबाबत माफी मागितली आहे. "काल अनावधानाने झालेल्या प्रसंगा बद्दल मी लगेच जाहीर माफी मागितली. 185 किमीचा प्रवास करुन मी माझ्या बापाचा फोटो फाडायला गेलो असतो का. मी मरन पत्करेन पण समजात जाती द्वेष आणि स्त्री द्वेशाची बीजे रोवणाऱ्या मनुला विरोध करणाऱ्या बापाची शिकवण विसरणार नाही, अशा शब्दात आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget