''कोरोनाचे इंजेक्शन घेतलं नसतं तर, आमच्यावर टीका करायला हे शिल्लक राहिले नसते''; रोहित पवारांचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील सगळ्या लोकसभा मतदारसंघात मी जात आहे याचाच भाग म्हणून मी बारामतीत आले आहे. महायुतीचा महिला मेळावा येथे आयोजित केला आहे, त्यासाठी मी आले असल्याचं चित्रा वाघ यांनी सुरुवातीला म्हटलं
पुणे : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या राजकीय नेत्यांचे दौरे वाढले असून विविध मतदारसंघात जाऊन उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी दिग्गज नेते बारामती मतदारसंघात फिरत आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांचे पती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये ठाण मांडून आहेत, सुनेत्रा यांच्या प्रचारासाठी ते मतदारसंघातील विविध ठिकाणी सभा घेत आहेत. तर, भाजपा व शिवसेना नेतेही बारामती मतदारसंघात बैठका, मेळावे आणि सभा घेत आहेत. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांनीही आज सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामतीत प्रचार दौरा केला. यावेळी, त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर हल्लाबोल केला. तर, आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान दिले आहे. बारामतीमध्ये एक महिला किंवा पुरष दाखवा, ज्यांना मोदी सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील सगळ्या लोकसभा मतदारसंघात मी जात आहे याचाच भाग म्हणून मी बारामतीत आले आहे. भाजप महायुतीचा महिला मेळावा येथे आयोजित केला आहे, त्यासाठी मी आले असल्याचं चित्रा वाघ यांनी सुरुवातीला म्हटलं. यावेळी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी रोहित पवार यांना चॅलेंजही दिलं. रोहित पवार यांच मत आम्हाला मिळेल याची अपेक्षा आम्हाला नाही. रोहित पवारांनी बारामतीमधील एक महिला किंवा पुरुष दाखवावा, ज्यांनी मोदींच्या एकाही योजनेचा लाभ घेतला नाही, असे आव्हान त्यांनी रोहित पवार यांना दिले. गरीब कल्याण योजना 20 लाख लाभार्थी, पीएम आवास योजना 78 हजार, आयुष्मान भारत साडेचार लाख, जनधन योजना 100 टक्के, जल जीवन मिशन योजना 2 लाख, पीएम किसान योजना अडीच लाख, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 96 हजार लोकांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून मोदींच्या योजनेचा लाभ घेतला असल्याची आकडेवारीच चित्रा वाघ यांनी दिली. तसेच, रोहित पवारांना माझं खुला आव्हान आहे, त्यांनी महाराष्ट्रातील एक माणूस मला दाखवावा ज्यांना मोदींच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही, असे आव्हानही वाघ यांनी दिले.
कोरोना कालावधीत केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या कोराना लसीचा उल्लेख करताना, कोरोनाचे इंजेक्शन घेतलं नसतं तर आमच्यावर टीका करायला देखील हे शिल्लक राहिले नसते, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. तर, जयंत पाटलांनी मोदींवर केलेल्या टीकेलाही चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं. जे पेरले गेलं ते समोर उगवले आहे, जे पेरले त्याचे रिटर्न्स त्यांना मिळालेले आहेत.
संविधान बदलावरही भाष्य
कोणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही, कुठेतरी आमच्या विरोधात चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम विरोधक करत आहेत. काँग्रेसच्या काळात संविधानात 80 बदल करण्यात आले आहेत. पण, ज्यांनी संविधान दिलं त्यांना निवडणुकीत दोनदा पाडण्याचं पाप या काँग्रेसने केल्याचंही वाघ यांनी सांगितलं.
ऑन बारामती लोकसभा लढाई
बारामती लोकसभेत यंदा बदल होईल. यावेळी पवारांची सुनबाई ही दिल्लीला नक्की जाईल. मोठ्या ताई किती बोलणार ? अडीच वर्षे सत्तेत होतात, त्यावेळी काय केलं?. त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असतो, ज्यावेळी सत्तेत असतात त्यावेळी सगळं विसरून जातात. विरोधक आल्यावर त्यांना सगळं आठवतं. त्या काय बोलतात याला फार महत्त्व नाही, त्यांची परिस्थिती बघून मला खूप हसायला येत आहे. गाडीमध्ये बसून एखाद्याचा रील काढून घ्यायचा तो लगेच व्हायरल करायचा, हेच त्यांचं काम आहे. तोंडाने म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटनकरी अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला.
हेही वाचा
छत्रपती संभाजीराजेंना जिथं कैद करुन ठेवलं, त्या देसाईवाड्याची दूरवस्था