एक्स्प्लोर

तालुक्यात भाजपची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या माजी आमदारालाच पहिल्या यादीतून डावललं; शिवाजी कर्डिलेंच्या उमेदवारीवरुन चंद्रशेखर कदम नाराज

Rahuri Assembly Election 2024 : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजी कर्डिले यांना पहिल्या यादी स्थान मिळालं. मात्र यावरून माजी आमदार चंद्रशेखर कदम नाराज झाल्याचे समोर आल आहे.

Maharashtra Assembly Election 2024: भाजपने पहिली यादी जाहीर करत बाजी मारली खरी, मात्र आता अनेक मतदारसंघात भाजपातील निष्ठावान या यादीवर नाराज असल्याच समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात (Rahuri Assembly Constituency) मागील वेळी पराभूत झालेल्या शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांना पहिल्या यादी स्थान मिळालं. मात्र राहुरी तालुक्यात दोन वेळेस आमदार असलेले आणि भाजपची (BJP) तालुक्यात मुहूर्तमेढ रोवणारे माजी आमदार चंद्रशेखर कदम (Chandrasekhar Kadam) हे मात्र नाराज झाल्याचे समोर आल आहे.

आपला मुलगा सत्यजित कदम याला उमेदवारीचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी त्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. यापूर्वी शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीसाठी मी विद्यमान आमदार असतानाही थांबलो होतो. मात्र पक्षाने मला शब्द देऊन तो पूर्ण केला नाही, त्यामुळे भविष्यात मुलगा जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी बोलून दाखवला आहे. 

कदम कुटुंबाने वेगळा निर्णय घेतला तर....

दरम्यान, चंद्रशेखर कदम यांचे पुत्र सत्यजित कदम यांनी गेल्या दहा वर्षात देवळाली प्रवरा नगरपालिकेच नगराध्यक्ष पद भूषवतांना मतदारसंघात देखील आपला ठसा उमटवला आहे. शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीनंतर सत्यजित कदम यांनी देखील बंडखोरीचे संकेत दिले असून ज्या कार्यकर्त्यांनी मला नेता केलं त्या कार्यकर्त्यांचा निर्णय पुढील दोन दिवसात जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट करू, असा इशाराच भाजपला दिलाय. दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांमुळे भाजपातील निष्ठावंतांची मोठी कोंडी निर्माण होत असल्याचं आता पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात कदम कुटुंबाने वेगळा निर्णय घेतला तर भाजप आणि महायुतीसाठी तो मोठा धक्का ठरेल यात शंका नाही, असेही ते म्हणाले आहे. 

2019 सालचा वचपा काढण्यासाठी सज्ज

2019 मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजी कर्डीले हे सज्ज झाले असून राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच मला राहुरीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला असल्याचं शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget