एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar: काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..

जागा वाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडसोमर आपले म्हणणे मांडत शिवसेना ठाकरे गटासमोर झुकणार नसल्याचा पवित्रा घेताला आहे. तर मविआत 17 जागांवरुन जुंपली असल्याची माहिती पुढे आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकींचे (Vidhansabha election 2024) बिगुल वाजल्यापासून काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागा वाटपाचा संघर्ष समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राज्यातील काँग्रेसचे (Congress) प्रमुख नेते आता दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर ठाकरे गटही आपल्या मतावर ठाम आहे. दरम्यान, मविआतील जागा वाटपाच्या मुद्द्यावर दोघेही पक्ष अडून बसल्याचं चित्र सध्या दिसत असून यांच्यातला वाद आता हायकमांडच्या दरबारात मांडला जाणार आहे.

अशातच राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडसोमर आपले म्हणणे मांडत शिवसेना ठाकरे गटासमोर झुकणार नसल्याचा पवित्रा घेताला आहे. वरकरणी जरी मविआत काहीही अलबेल नसले तरी 17 जागांवरुन मविआमध्ये (Maha Vikas Aghadi) जुंपली असल्याची माहिती पुढे आली आहे. यावर बोलताना काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपली प्रतिक्रिया देत उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

जागावाटपाची चर्चा संपल्यात जमा आहे. केवळ 15-16 जागांची चर्चा होणे बाकी आहे. तर राज्यातील 7-8 जागा आमच्यात बदलायचे ठरलं आहे. परिणामी, उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल आणि उद्या संध्याकाळी आम्ही जागा जाहीर करून पुढे गेलेले असू, असा विश्वास विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

आज रात्री किंवा उद्या सकाळी आमची यादी येईल

जागावाटप बाबत महायुतीच्या नेत्यांनी देव पाण्यात बुडू ठेवले असेल तर ते स्वप्नात आहेत. जेव्हा काही पक्ष सोबत येत असतात तेव्हा काही प्रमाणात थोडीफार नाराजी असतेच. त्यांची आम्ही समज घालू आणि आघाडी म्हणून एकत्र लढू. तिन्ही पक्षांचा 17 जागांचा तिढा आहे. तो उद्या रात्रीपर्यंत सुटेल. याबाबत काल आम्ही हायकमांड सोबत चर्चा करून माहिती दिली. मार्ग कसा काढायचा यावर देखील त्यांच्याशी आम्ही बोललो. 90 जागा घेऊन आम्ही आज CEC मध्ये जात आहोत. आज रात्री किंवा उद्या सकाळी आमची यादी येईल. विदर्भात 5-6 जागांवर आमचा वाद आहे, तो देखील सुटेल असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. 

उमेदवार मेरिटच्या आधारावर देण्यासंदर्भात चर्चा- नाना पटोले

महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी भेटून जागावाटपावर विचारविमर्श केला जाणार आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, "काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होऊ शकते, आकडा उद्याच सांगू. उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचा विचार आहे. नसीम खान यांची पवार आणि उद्धव ठाकरेंच्याशी चर्चा सुरू आहे. आम्ही दिल्लीत असल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी सोपावली आहे. 30 ते 40 जागांवर संयुक्तीक वाद आहे. उमेदवार मेरिटच्या आधारावर देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे."

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन
भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन
अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात घुसले वंचितचे कार्यकर्ते; माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या
अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात घुसले वंचितचे कार्यकर्ते; माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar NCP List :  राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यताSuhas Kande Shivsena : शिवसेनेच्या सुहास कांदेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा विरोधYogendra Yadav Speech News : योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडाABP Majha Headlines :  2 PM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन
भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन
अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात घुसले वंचितचे कार्यकर्ते; माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या
अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात घुसले वंचितचे कार्यकर्ते; माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या
Maharashtra Assembly Election 2024: देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या भेटीची आवई उठली, ठाकरे गटातून पहिली प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या भेटीची आवई उठली, ठाकरे गटातून पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha 2024: ऊसतोड कामगार संघटनेचं महायुतीला थेट आव्हान, राज्यातील या 5 जागा लढविणार, बैठकीत निर्णय
ऊसतोड कामगार संघटनेचं महायुतीला थेट आव्हान, राज्यातील या 5 जागा लढविणार, बैठकीत निर्णय
हरियाणाच्या निकालानंतर ठाकरे गटाला अचानक बळ आलं, आता काँग्रेसचे नेतेही अडून बसले, मविआचं जागावाटप लांबणार
हरियाणाच्या निकालानंतर ठाकरे गटाला अचानक बळ आलं, आता काँग्रेसचे नेतेही अडून बसले, मविआचं जागावाटप लांबणार
Maharashtra Assembly Elections 2024 : दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
Embed widget