Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
इतर वेळी लहान सहान बाबतीतही कारवाई करणारी ईडी हजारो,कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या वाल्मीक कराडला साधी नोटीसही देत नाही.
Ambadas Danve: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेग आला असून खंडणी ते खुनापर्यंत संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या वाल्मीक कराड (Walmik Karad) यांच्या संपत्तीविषयी रोज नवनवे खुलासे होत आहेत. दरम्यान वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय आल्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर निर्णय चांगला आहे. पण वाल्मीक कराडच्या स्वतःच्या नावावर किती संपत्ती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार असा सवाल शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलाय.
वाल्मीक कराड एवढे दिवस फरार होता. या दरम्यान वाल्मीक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली. याचा तपास ईडीने करायला हवा. आणि त्यावर कारवाई करायला हवी. सरकार या संपूर्ण प्रकरणात पक्षपातीपणे वागत असल्याचही दानवे म्हणाले. इतर वेळी लहान सहान बाबतीतही कारवाई करणारी ईडी हजारो,कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या वाल्मीक कराडला साधी नोटीसही देत नाही. यावर साधा तपास करत नाही. त्यामुळे या संपूर्ण तपासावर निश्चितपणे संभ्रम असल्यासही अंबादास दानवे म्हणाले.
'ते एकाच नाण्याच्या दोन बाजू'
या प्रकरणात अजूनही एक आरोपी फरार आहे. या प्रकरणातले सीसीटीव्ही व्हिडिओ मीडियाला कळतात पण पोलिसांना माहित नाहीत. याचा अर्थ पोलिसांचेच व्हिडिओ आहेत. पोलिसांना हे सगळं शोधणं अवघड काम नाही. पोलीस या प्रकरणाचा हवा तसा तपास करत नसल्याचं सत्य आहे. दुसरीकडे या प्रकरणात विरोधक धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणत अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडेंवरही कारवाई करायला हवी. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता आणि पक्षानेही तो घ्यायला हवा होता असं ते म्हणालेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, एसटी बसची भाडेवाढ यावरही अंबादास दानवे बोलले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळ्यांच्याच अपेक्षा असतात. पण यात जागावाटप खूप अवघड आहे. ज्याला वेगळं लढायचं आहे त्याला आम्ही परवानगी देऊ शकतो असेही ते म्हणाले. दरम्यान एसटी भाडेवाढ संदर्भात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. या विरोधात शिवसेना आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणालेत.
हेही वाचा: