एक्स्प्लोर

हिंदू-मुस्लिम एकोप्याचा परभणी पॅटर्न! शिवपुराण कथेसाठी मुस्लिम बांधवाने दिली 60 एकर जागा 

Parbhani Hindu Muslim Unity: मुस्लिम बांधवांच्या इजतेमासाठी हिंदू बांधवानी दिली होती जमीन... 

Parbhani Hindu Muslim Unity: सर्वधर्म समभाव हा राज्यातील एकोप्याचा मोठा पाया आहे. परंतु मागच्या काही दिवसात राज्यभरात विविध धर्मात तेढ वाढण्याचे प्रकरण समोर येत असताना परभणीत मात्र हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन वारंवार पाहायला मिळत आहे. मुस्लिमांचा इजतेमा हिंदूंच्या जागेवर अन् हिंदूचे शिवपुराण चक्क मुस्लिमाच्या जागेवर परभणीत होत आहे. एवढच नाही तर या मुस्लिम बांधवाने शिवपुराणासाठी चक्क 15 एकर तूर आणि साडेतीन एकर हरभऱ्यावर नांगर फिरवलाय.. 

"जगात जर्मनी अन भारतात परभणी"अशी म्हण परभणीबाबत प्रचलित आहे. हे म्हणण्या सारखे नेमकं परभणीत असं काय आहे असा प्रश्न सर्वांना पडतो. त्याचे उत्तर आहे ते म्हणजे परभणीची माणसं.. कुणालाही आपलेसे करण्याची इथली परंपरा आहे..त्यातच सर्वधर्म समभावाने इथे सर्वच समाज बांधव वागतात..आता हेच बघा ना परभणीत आठ डिसेंबरला मुस्लिम समाजाचा इजतेमा पार पडला..तीन दिवस लाखो मुस्लिम बांधव इथे आले, धर्माची शिकवण घेतली. त्यांच्यासाठी इथे हिंदू बांधव मदतीला आहे..इजतेमा साठी हिंदूंची जमीन देण्यात आली, तसेच इतर सोयीसुविधांची हिंदु समाजातील तरुणांनी व्यवस्था केली होती.. 

येत्या 13 ते 17 जानेवारी दरम्यान परभणीत पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांचे विख्यात शिवपुराण शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आयोजित केले आहे. आता एवढा मोठा कार्यक्रम नेमका घ्यायचा कुठे असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र परभणीतील प्लॉटिंग व्यासायिक हाजी शोएब यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपली ६० एकर जमीन या शिवपुराण कथेसाठी विनामूल्य वापरासाठी दिली. एवढेच नाही तर यातील 15 एकर वर त्यांची तूर आणि साडे तीन एकर वर लावलेल्या हरभऱ्यावर त्यांनी नांगर फिरवत हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमासाठी लाखोंचे नुकसान सहन केले आहे. जिथे शिवपुराण कथेची जोरदार तयारी सुरूय.. 

प्रदीप मिश्रा कोण आहेत.. 

42 वर्षीय प्रदीप मिश्रा हे मध्यप्रदेशच्या सिहोर येथील रहिवाशी आहेत .

प्रदीप मिश्रा हे अध्यात्मिक गुरु,कथावाचक,गायक आहेत. 

ज्यांची सर्व प्रवचन हि शिवपुराणावर असतात .

देशभरात त्यांचे प्रवचन प्रसिद्ध आहे.

दरम्यान एक काळ असा होता राज्यात कुठेही धार्मिक वादाच्या घटना घडल्या तर त्याचे पहिले पडसाद परभणीत उमटायचे. मात्र मागच्या 10 ते 15 वर्षात परभणीकरांनी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक एकता जोपासलीय. जी इतर शहरांनी जोपासणे आज अत्यंत गरजेचे बनले आहे.. 

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Bank Glitches On Loan Waiver Portal: कर्जमाफीच्या पोर्टलवर बँकेचा घोळ, प्रत्यक्ष कर्जापेक्षा चार ते पाच पट अधिक रकमेची नोंद; चुकीच्या नोंदींचा 68 शेतकऱ्यांना फटका
कर्जमाफीच्या पोर्टलवर बँकेचा घोळ, प्रत्यक्ष कर्जापेक्षा चार ते पाच पट अधिक रकमेची नोंद; चुकीच्या नोंदींचा 68 शेतकऱ्यांना फटका
Parbhani News : मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा डोंगर, 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन; परभणीतील धक्कादायक घटना
मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा डोंगर, 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन; परभणीतील धक्कादायक घटना
Parbhani Crime News: खळबळजनक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षाकडून शिंदेसेनेच्या नगरसेवकाच्या भावाला बेदम मारहाण; परभणीत अंकुश लाडसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षाकडून शिंदेसेनेच्या नगरसेवकाच्या भावाला बेदम मारहाण; अंकुश लाडसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, परभणीत खळबळ
चारा टंचाई टाळण्यासाठी परभणी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! सोयाबीन अन् तुरीच्या कुटाराबाबत मोठा निर्णय
चारा टंचाई टाळण्यासाठी परभणी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! सोयाबीन अन् तुरीच्या कुटाराबाबत मोठा निर्णय

व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Shyamkumar Barve: थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
'थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या'; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल, LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल LIVE
Embed widget