एक्स्प्लोर
Parbhani Rain: परभणी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शेतकऱ्यांची सोयाबीन वाचवण्यासाठी धडपड!
Parbhani Rain: परभणी जिल्ह्यात पहाटे पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.शहरासह जिल्ह्यातील शेत शिवार पुन्हा पाण्याखाली गेले.
Parbhani Rain
1/6

परभणी जिल्ह्यात पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरले. शहरासह जिल्ह्यातील शेत शिवार पुन्हा पाण्याखाली गेले.
2/6

गाडगेबाबा नगर, अक्षदा मंगल कार्यालय परिसर आणि सागर नगर भागातील नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले.
3/6

अक्षदा मंगल कार्यालय परिसरातील काही नागरिकांना स्थलांतरित केले. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सोयाबीन भिजले.
4/6

मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील शेतकरी पांडुरंग पंडितराव भिसे यांच्या शेतात काल दिवसभर सोयाबीन कापून मळणी यंत्राच्या साह्याने सोयाबीन काढले होते.
5/6

काढलेले सोयाबीन रात्री शेतात ठेवले होते, पहाटे मुसळधार पाऊस झाल्यामुळे सोयाबीन भिजले. शेतकरी काढून ठेवलेले सोयाबीन वाचवण्यासाठी धडपड करत होते.
6/6

सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क मांडी एवढ्या पाण्यातून सोयाबीनचे पोते बाहेर काढले.
Published at : 06 Oct 2025 11:13 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नांदेड
राजकारण
























