Manoj Jarange On Devendra Fadnavis : 'फडणवीस तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय, सुपडासाफ होईल'; मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange On Devendra Fadnavis : नऊ वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी मारली, तिच्यात तुम्हाला तुमची मुलगी दिसत नाही का? असा सवाल जरांगेंनी फडणवीसांना विचारला.
Manoj Jarange On Devendra Fadnavis : 'फडवणीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय, तुमचा सुपडासाफ होईल', असा थेट इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्याचा दौरा करतायत. दरम्यान, रविवारी त्यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी बोलतांना त्यांनी फडणवीस यांच्यासह मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
परभणीच्या मानवत शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानात रविवारी मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव बैठकीला उपस्थित होते. दरम्यान याचवेळी बोलतांना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. "फडवणीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय, तुमचा सुपाडा साफ होईल पहा, असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला आहे.
फडवणीस मला संपवणार...
नऊ वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी मारली, तिच्यात तुम्हाला तुमची मुलगी दिसत नाही का? असा सवाल जरांगेंनी फडणवीसांना विचारला. महत्वाचे म्हणजे फडवणीस मला संपवणार आहेत. त्यांना देव मानणाऱ्या एकाने मला सांगितले असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केलाय.
भुजबळ हिमालयात जाऊन बसले का?
परभणीच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यासह छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. "छगन भुजबळ आठ दिवसापासून गार पडले आहेत. हिमालयात जाऊन बसले आहेत का? असे म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळांना डिवचले आहे.
ओबीसीमधूनच आरक्षण घेणार, एक इंचही मागे हटणार नाही
मनोज जरांगे दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर असुन, रविवारी त्यांची मानवत शहरात संवाद बैठक पार पडली. ज्यात जरांगेनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच लक्ष केलंय. तसेच छगन भुजबळ यांनाही टोला लगावत आपण ओबीसीमधूनच आरक्षण घेणार, एक इंचही मागे हटणार नाही असा निर्धार व्यक्त केला.
फडणवीसांमुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल....
मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होत आहेत. यावर बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, "बुडतीचे पाय डोहाकडे आहेत. देवेंद्र फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहेत. माझ्यावर एवढे जळू नका, आम्ही मागतोय ते आरक्षण द्या, पण तसे होत नाही. फडणवीस यांच्या वागण्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल. गोरगरीब मराठा समाज एकदा पण केला की तो पूर्णच करतो. तुम्हाला तुमचा पण पूर्ण करायचा आहे, आम्ही देखील आमचा पण पूर्ण करू" असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. बीडच्या गेवराई येथे आयोजित नोकरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी बोलत होते.
इतर महत्वाच्या बातम्या :