(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservaion : सगेसोयरेची अंमलबजावणी करा, अन्यथा राजकीय सुपडा साफ करु, सरकारला आव्हान देण्यासाठी मनोज जरांगेंची 900 एकरात सभा
Manoj Jarange Patil, Beed : "सगेसोयरेची अंमलबजावणी करा, अन्यथा तुमचा राजकीय सुपडा साफ करु", असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.
Manoj Jarange Patil, Beed : "सगेसोयरेची अंमलबजावणी करा, अन्यथा तुमचा राजकीय सुपडा साफ करु", असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. शिवाय, सरकारला तगड आव्हान उभं करण्यासाठी मराठा समाजाने प्रत्येक मतदार संघातून 2 हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणनिती आखली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) 900 एकरात सभा घेऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. पिंपळवाडी (Pimpalwadi) येथे जरांगे यांनी याबाबत माहिती दिली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, क्रांती 300 ते 350 वर्षांनंतर होते. आमच्या जीवावर जे बसले त्यांनी जरा लाज धरली पाहिजे. समाजाने अनेक वर्षे संघर्ष केलाय हे सरकारनेही लक्षात घ्यावे. नाहीतर राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय समाज शांत बसणार नाही. घरा घरातले लेकरं मोठे करायचे असतील तर घराच्या बाहेर पडावे लागेल. तुम्हाला राजकारण करायचंय ते करा त्याच काही देण घेणं नाही. माझा उद्देश माझ्या समाजाचे पोर मोठे झाले पाहिजे, एवढाचं आहे, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
मराठा समाज ऊन-वारा पाहायला तयार नाही, आरक्षणच घेणार
सरकारला पाठीमागे बोललो ते लई लागलं पण आमच्या आई बहिणीचे डोके फुटले तेंव्हा कुठे गेले होते? मराठा समाज ऊन-वारा पाहायला तयार नाही, आरक्षणच घेणारच आहे. तुम्ही आमच्या आंतरवाली येथील माता माउलींच्या डोक्यात गोळ्या घातल्या तेंव्हा तुम्हाला आई बहीण कळलं नाही का? असा सवाल मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
अंतरवाली येथे जे लाठी चार्ज झाला तेंव्हा हे नेते कुठं गेले होते?
तिच्या डोक्यात दस्ते मारले गेले एका नऊ वर्ष्याच्या मुलीच्या पायात गोळ्या घातल्या. तुमच्या घरातली ती आई आणि आमची आई ती तुमची आई होतं नाही का? पिढ्यानं पार माझ्या बापजाद्याने तुम्हाला मोठं केलं. वारे सरकार त्या मराठ्यांच्या त्या मंत्र्यांचं म्हणन आमच्या नेत्याला बोलले. अंतरवाली येथे जे लाठी चार्ज झाला तेंव्हा हे नेते कुठं गेले होते? आता तुमची गाठ आमच्याशी आहे. मी माझ्या समाजाला दैवत मानलं. माझं कुटुंबं मी बाजूला सारून मी समाजासाठी काम करतो.
गोर गरिबांचे पोर मोठे झाले पाहिजेत. खोटे आव्हाल बनून मला जेल मध्ये टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एसआयटी नेमली ते आम्हाला बनवणार हे माहित होतं. मी नऊ दिवस झालं एसआयटीची वाट पाहातोय. कधीही फोन करा मी खानदानी आवलाद आहे, भीत नाही. आता आरक्षण घेतल्या शिवाय माघार घेऊ नका. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेतल्या शिवाय माघार नाही, असंही जरांगे यांनी यावेळी नमूदं केलं.
आरक्षण द्या, तुम्हाला मराठे डोक्यावर घेऊन नाचतील
देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे, मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही मराठ्यांचा कार्यक्रम करणार तर तुमचाही मराठे कार्यक्रम करणार. तुम्ही उगाच मराठ्यांच्या रोषाची लाट अंगावर घेतली. आता घोडा मैदान समोर आलय. मराठा समाज एकही माणूस तुमचा निवडून येऊ देणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या