Parbhani: मोबाईलच्या नादात विहिरीत पडला, आठवीतल्या मुलाचा मृत्यू
Mobile: मोबाईलच्या वेडात 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. परभणीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
Keep Your Child Away From Mobile: जगभरात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लहानग्या मुलांकडे आज मोबाईल पाहायला मिळतो.. बाळ जेवत नाही, रडायला लागलं.. की पालकं मोबाईल हातात देतात.. त्यामुळे लहानपणापासूनच मोबाईलचं व्यसन लागतं. त्यामुळे याचा अनेकदा फटका बसतो... मोबाईलच्या जेवघेण्या वेडातून आठवीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलेय. परभणीच्या नागरजवळा गावातील मुलाचा मोबाईलमुळे मृत्यू झालाय. येथील होगे कुटुंबियांना मोबाईलमुळे आपला एकुलता एक मुलगा गमवावा लागलाय.
परभणीच्या मानवत तालुक्यातील नागरजवळा गावातील आठवीत शिकणारा 13 वर्षीय अभिषेक काल (शनिवार) वडील बाबासाहेब यांच्यासह शेतात गेला..शेतात टरबूज लागवड सुरू होती. यावेळी ठिबक सिंचनाची नळी कापण्यासाठी वडिलांनी अभिषेकला आखाड्यावरून आरपत्ती आणण्यास सांगितले. अभिषेकने मोबाईल द्या मगच आणतो, असा हट्ट धरला. वडिलांना त्याचा हट्ट पूर्ण करावा लागला अन् अभिषेक मोबाईल बघत बघतच पुढे गेला. मोबाईल पाहत असल्यामुळे अभिषेकला आखाड्यावरील विहिरीचा अंदाज आला नाही. मोबाईल पाहात पाहात तो थेट विहिरीत कोसळला. त्यानंतर जोराचा आवाज झाला. त्यानंतर तात्काळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. अभिषेकला बाहेर काढले अन गावातून मानवत शहरातील रुग्णालयात अवघ्या 20 मीनिटात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अभिषेकचे वडील बाबासाहेब होगे हे अतिशय मेहनती शेतकरी आहेत. त्यांना 2 मुली आणि एकुलता एक अभिषेक हा मुलगा होता. त्याच्या अशा एकाएकी जाण्याने अख्खे होगे कुटुंब खचून गेलंय.. आई सारखं रडतेय. वडिलांना मोठा धक्का बसलाय. पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लेकराच्या जाण्याने पुर्ण नागरजवळा गाव ऐन संक्रांतीच्या दिवशी दुःखात आहे. गावात प्रत्येक जण आता यापुढे मुलांकडे लक्ष देऊन मोबाईलचा वापर कमी करून त्यांच्या कडे लक्ष देण्याबाबत चर्चा करताहेत..
दरम्यान शहर असो की गाव प्रत्येक घरात व्यक्ती नुसार मोबाईल झाले आहेत. त्यातूनच घरी मुलं कधी गेम खेळत बसतात तर कधी अॅपलर असतात.. त्यामुळे अनेक पालकांना आर्थिक नुकसान झालेय. सध्या तरुणीईला रिल्सचं वेड लागलं आहे... रिल्सपुढे त्यांना काहीही सुचत नाही.. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देताना विचार करा, असं गावचे माजी सरपंच सुरेश होगे यांनी सांगितलं.
आणखी वाचा:
Nepal Plane Crash: नेपाळ विमान दुर्घटनेत 5 भारतीयांचा मृत्यू, आतार्पंतचं सर्व अपडेट एका क्लिकवर