(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar: हुतात्मा दिनी पालघरवासियांकडून अभिवादन; पालघरमधील पाच हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
14 August 1942 Hutatma Din Palghar: 14 ऑगस्ट हा दिवस पालघरमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.
पालघर: 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात चाले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारांवर पालघर येथे गोळीबार करण्यात आला होता. 'चले जाव' चळवळीत पालघर (Palghar) तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना (Freedom Fighters) हौतात्म्य प्राप्त झालं होतं. त्यामुळे 14 ऑगस्ट हा दिवस पालघरमध्ये 'हुतात्मा दिन' म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने आज पालघर येथे मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.
पालघर शहरातील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्तंभ येथे विद्यार्थी, नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनातील गोळीबारात पालघरमधील गोविंद गणेश ठाकूर, सातपाटी येथील येथील काशिनाथ हरी पागधरे, पालघर येथील रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवड येथील सुकुर गोविंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झालं. त्या दिवसापासून 14 ऑगस्ट हा पालघरमध्ये 'हुतात्मा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी पालघरमधील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात येतात, कडकडीत बंद पाळून हा दिवस साजरा केला जातो. सदर घटनास्थळी उभारण्यात आलेल्या बत्ती येथे श्रद्धांजली वाहिली जाते.
पालघरचा इतिहास
1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर महाराष्ट्राचा 36वा जिल्हा बनला. जव्हार, वसई आणि पालघरला ऐतिहासिक वारसा आहे. वसई (तेव्हा बसीन म्हणून ओळखलं जायचं) पोर्तुगीज साम्राज्याच्या अंतर्गत होतं. चिमाजी अप्पा, मराठा सैन्याने पोर्तुगीजांकडून वसई किल्ला काबीज केला आणि वसईवर मराठा ध्वज फडकवला. 1942 मधील चले जाओ चळवळीत पालघर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता.
14 ऑगस्ट 1942 रोजी पालघरमध्ये इंग्रजांविरुद्ध उठाव झाला, त्यात काशिनाथ हरी पगधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, रामचंद्र महादेव चुरी आणि गोविंद सुकुर मोरे यांना हौतात्म्य मिळालं. पालघरचे मुख्य मंडळ या शहिदांच्या सन्मानार्थ "पाचबत्ती" (मराठीत 'पाच दिवे') म्हणून ओळखलं जातं. 14 ऑगस्ट पालघरमध्ये "हुतात्मा दिन" म्हणून घोषित करण्यात आला आहे. यादिवशी पालघरचे नागरित पाचबत्ती चौफुलीवर जमतात आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या पाच हुतात्म्यांनी आदरांजली वाहतात.
14 ऑगस्टला प्रत्येक वर्षी संपूर्ण तालुक्यातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, लोक प्रतिनिधी, सरकारी अधिकारी हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयापासून मूक मिरवणूक काढून आदरांजली वाहण्यासाठी पालघरच्या हुतात्मा चौकात उपस्थित राहतात. हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्याचा पहिला मान स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या पत्नी वा कुटुबियांचा असतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Independence Day: भारताव्यतिरिक्त कोणते देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतात?