Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
पुणे-नाशिक महामार्गावर (कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात झालाय. या प्रकरणी मोहिते पाटलांचे पुतणे मयुर मोहितेवर (Mayur Mohite) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होता, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपी मयूर मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहितेंचा पुतण्या मयूर मोहितेकडून नेमका कुठं अपघात झाला? कसा झाला? नेमकी चूक कोणाची होती? मयूरनं कोणत्या दिशेनं आणि कशी गाडी चालवली?




















