JDU चा मोठा निर्णय, नितीश कुमार पुन्हा अध्यक्ष, ललन सिंह यांचा राजीनामा!
Nitish Kumar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनता दल संयुक्तच्या (Janata Dal United) कार्यकारणी बैठकीत मोठा बदल करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुक (Loksabha Election) डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीत जनता दलाच्या कार्यकारणी बैठक बोलावण्यात आली होती
New Delhi : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनता दल संयुक्तच्या (Janata Dal United) कार्यकारणी बैठकीत मोठा बदल करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुक (Loksabha Election) डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीत जनता दलाच्या कार्यकारणी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान, जनता दलाचे अध्यक्ष लल्लन सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. आता जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आहे.
ललन सिंह यांच्याकडून नितीश कुमार यांच्या नावाच प्रस्ताव (Nitish Kumar)
ललन सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नितीश कुमार यांच्यावर पक्षाच्या प्रमुख पदाची जबाबदार सोपवण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवला होता. यानंतर पुन्हा एकदा नितीश कुमार यांची जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीच्या बैठकीत नितीश कुमार आणि ललन सिंह (Lalan Singh) एकाच गाडीत बसून रवाना झाले होते.
कार्यकर्त्यांकडून 'नितीश कुमार जिंदाबाद'च्या घोषणा
नितीश कुमार यांची जनता दल संयुक्तच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'नितीश कुमार यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे' अशाही घोषणा नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याकडून देण्यात येत होत्या. बिहार सरकारमध्ये मंत्री असणारे विजय कुमार चौधरी याबाबत बोलताना म्हणाले, नितीश कुमार यांनी अध्यक्षपदाची जबाबदार स्वीकारली आहे. ललन सिंह म्हणाले की, त्यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री असताना अध्यक्षपद स्वीकारले आहे.
नितीश कुमार यांच्याकडे कोणते अधिकार?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनता दल संयुक्तची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या पक्षातील अधिकारांमध्ये वाढ झाली आहे. जागा वाटप, कोणत्या पक्षाशी युती किंवा आघाडी करायची? आणि उमेदवारांच्या निवडीचे अधिकार नितीश कुमार यांच्याकडे असणार आहेत. आजच्या बैठकीपूर्वी, नितीश कुमार आणि ललन सिंह यांच्यामध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या