महाराष्ट्रात मान्सून दाखल मात्र, नाशिकमध्ये प्रतिक्षा कायम, पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर
महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) दाखल झाला आहे. मात्र, नाशिक (Nashik) जिल्ह्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर आहे.
Nashik Water Crisis : महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) दाखल झाला आहे. मात्र, नाशिक (Nashik) जिल्ह्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर आहे. गंगापूर धरणात अवघा 18 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं आता नाशिककरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न हा गंभीर होण्याची शक्यता
पावसानं वेळेवर हुलकावणी दिल्यास शहरात पाणीबाणी कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून, नाशिक जिल्ह्यात मात्र मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकचे पाणी संकट हे अधिकच गडद होत असताना आता नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाने देखील तळ गाठला आहे. गंगापूर धरणात अवघा 18.59 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर दाखल न झाल्यास नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न हा गंभीर होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर
नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. तर एकूण 23 मोठ्या धरणांपैकी 10 धरणात अवघा शून्य टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं नाशिकमधील धरणांनी तळ गाठल्यामुळं आता नाशिककरांना मान्सूनची प्रतीक्षा लागली असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात 6 जून रोजी मान्सून दाखल
राज्यात 6 जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. दिलेल्या अंदाजापेक्षा चार पाच दिवस आधाची मान्सून दाखल झाला आहे. आता हळूहळू मान्सूनने राज्य व्यापण्यास सुरुवात केली आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असला, तरी अनेक जिल्ह्यात मान्सून दाखल झालेला नाही. यामधीलच एक जिल्हा म्हणजे नाशिक. नाशिक जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाने देखील तळ गाठला आहे. गंगापूर धरणात फक्त 18.59 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात फक्त 8.48 टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं नाशिककर चिंतेत आहेत. कधी पाऊस पडणार? असा प्रश्न शेतकरी करत आहेत.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पावसासाठी राज्यभरात पोषक वातावरण देखील तयार होत आहे. काही जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी देखील लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या:
10 ते 14 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार, पुढील चार दिवस 'या' भागात मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज