एक्स्प्लोर

10 ते 14 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार, पुढील चार दिवस 'या' भागात मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज

राज्याच्या उर्वरित भागात पोहोचण्यास मान्सूनला (Monsoon) पोषक हवामान असून, 10 ते 14 जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे.

Maharashtra Monsoon News : राज्यातील शेतकरी (Farmers) आतुरतेने पावसाची (Rain) वाट पाहत होते. काल अखेर राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. मान्सून सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूरमध्येही पोहोचला आहे. राज्याच्या उर्वरित भागात पोहोचण्यास मान्सूनला पोषक हवामान असून, 10 ते 14 जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा वेळेपेक्षा आधी दाखल 

मान्सूनने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वेळेपेक्षा आधीच हजेरी लावली आहे. यामुळं राज्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनचे गुरुवारी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमन झाले आहे. मान्सूनने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तसेच बंगालच्या उपसागरात बहुतांशी भागात मान्सून पोहोचला आहे. मान्सूनची सीमा गुरुवारी रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयानगरम, इस्लामपूर (प. बंगाल) भागात होती.

2 ते 3 दिवसांत मान्सून पुणे, मुंबईपर्यंत प्रगती करणार

मान्सून लवकरच संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापणार आहे. तसेच तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सून व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच 2 ते 3 दिवसांत मान्सून पुणे, मुंबईपर्यंत प्रगती करणार आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मुदतपूर्व पावसाने हलका दिलासा दिला होता. मात्र, आता मान्सूनचे आगमन झाले आहे. तसेच मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. गुरुवारी पुणे, जळगाव, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी, धाराशीव, अकोला येथे पावसाची नोंद झाली आहे.

राज्यभरात पावसाचा कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट

येत्या 10 जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, येथे अतिवृष्टी, मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे.

महत्वाच्या बातम्या:

मान्सून आला म्हणजे काय? मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस सुरू होतो का? सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
Karuna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा
Karuna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat : खासदारच नाही आमदार पण संपर्कात,'उबाठा'मध्ये कोणी राहू इच्छित नाहीABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 07 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सKaruna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशाराABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 07 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
Karuna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा
Karuna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा
Sujay Vikhe Patil : बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, सुजय विखे पाटील दाखल करणार जनहित याचिका, म्हणाले...
बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, सुजय विखे पाटील दाखल करणार जनहित याचिका, म्हणाले...
Accident : महाकुंभसाठी चाललेल्या 8 दोस्तांचा दुर्दैवी अंत, धावत्या बसचा टायर फुटला, दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या कारवर आदळली; सर्वांनी जागीच प्राण सोडला
महाकुंभसाठी चाललेल्या 8 दोस्तांचा दुर्दैवी अंत, धावत्या बसचा टायर फुटला, दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या कारवर आदळली; सर्वांनी जागीच प्राण सोडला
Ind vs Eng : मॅच जिंकली तरी कोच गौतम गंभीरला रात्री झोप लागेना; टीम इंडियाला लागले मोठे 'ग्रहण'
मॅच जिंकली तरी कोच गौतम गंभीरला रात्री झोप लागेना; टीम इंडियाला लागले मोठे 'ग्रहण'
Sanjay Raut : शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स, कधीही कापला जाईल; ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा खोचक टोला
शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स, कधीही कापला जाईल; ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget