Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Nashik Crime News : नाशिकच्या इगतपुरीत (Igatpuri Crime News) एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. यात अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे.

Nashik Crime News : नाशिकच्या इगतपुरीत (Igatpuri Crime News) एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. यात अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा (Crime News) दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिसांत धाव घेतलीय. इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात हा संतापजनक प्रकार घडला असून घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Igatpuri Crime News : गुंगीचे औषध, मद्य पाजून दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार
दरम्यान, संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिसांत धाव घेतलीय. इगतपुरी पोलिसांकडून मात्र फिर्याद घेण्यास टाळाटाळ सुरू असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची माहिती आहे. गुंगीचे औषध, मद्य पाजून अत्याचार केल्याचा पिडीत विद्यार्थ्यांसह पालकांचा आरोप आहे. तर व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं हे गंभीर प्रकार घडल्याचा दावा करत पालकांनी कारवाईची मागणी केली आहे. अशातच, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यामागील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे.
Jalgaon Crime : थार गाडीची तोडफोड करत दोन तरुणांना मारहाण
जळगावमधील मास्टर कॉलनीत थार गाडीची तोडफोड करत दोन तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. अवैधपणे होणाऱ्या गुरांच्या तस्करीला विरोध केल्याच्या रागातून तोडफोड तसेच मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीत जखमी दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही तरुणांनी रात्री मास्टर कॉलनीत गुरांची वाहतूक करणारी गाडी पकडल्यानंतर वाहतूक करणारे आणि विरोध करणाऱ्या तरुणांमध्ये वाद झाला. यावेळी पोलिस कारवाई करण्यासाठी गेलेले असता पोलिसांवर देखील दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.
Gadchiroli News : नदीत बुडून युवा अभियंत्याचा मृत्यू
मित्रांसोबत आंघोळीसाठी वैनगंगा नदीवर गेलेल्या आरमोरी येथील एका युवा अभियंत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुभम नामदेव रामटेके (25 वर्ष) असे त्याचे नाव आहे. भंगारच्या छोट्या व्यवसायातून कष्ट करून वडिलांनी एकुलता एक मुलगा असलेल्या शुभमला अभियंता केले होते. दोन महिन्यांपूर्वीच तो एका कंपनीत नोकरीला लागला असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शुभम हा रंगपंचमीच्या दिवशी वैनगंगा नदीवर मित्रांसोबत आंघोळ करण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गटांगळ्या खात बुडाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. मासेमाऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला.
इतर महत्वाच्या बातम्या
























