इराण इस्रायल युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही, द्राक्ष बागायतदार संघाची माहिती, सध्या किती मिळतोय बाजारभाव?
अमेरिका - इस्रायल - इराण युद्धाचा महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीवर कोणताही परिणाम सध्यातरी झालेला दिसत नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने दिली आहे.
Nashik News : अमेरिका - इस्रायल - इराण युद्धाचा महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीवर कोणताही परिणाम सध्यातरी झालेला दिसत नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ व द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दिली आहे. सध्या द्राक्ष निर्यात सुरळीत सुरू असून बाजारभावही समाधानकारक असल्याची माहिती त्यांनी दिली. आखाती देशांमध्ये द्राक्ष निर्यात प्रामुख्याने डिसेंबर व जानेवारी महिन्यात होते. सध्या त्या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात निर्यात सुरु आहे असल्याचे भोसले म्हणाले.
फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यांत युरोप, यूके आणि रशिया या देशांकडे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यात केली जाते. सध्या आफ्रिका खंडातूनही द्राक्ष निर्यात सुरू आहे. त्यामुळं युद्धाचा निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबई येथील जेएनपीटी बंदरावर कांदा, तांदूळ, केळी व इतर शेतीमालाच्या कंटेनरमुळे काही प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र परिस्थिती आता सुरळीत होत आहे. द्राक्षांच्या बाजारभावाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मे महिन्यापासून सहा महिने सतत झालेल्या पावसामुळे सुमारे 70 टक्के द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. केवळ 30 टक्के उत्पादन हाती आले. उत्पादन घटल्याने यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट दर मिळत आहेत..सध्या थॉमसन द्राक्षांना प्रतिकिलो 150 ते 160 रुपये, क्रिमसन (.कलर ) द्राक्षांना 150 ते 170 रुपये दर मिळत असून बिगर निर्यात दर्जाच्या द्राक्षांना देशांतर्गत बाजारात 70 ते 80 रुपये दर मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.
द्राक्ष, केळी आणि कांदा उत्पादकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
मध्य-पूर्वेतील युद्धाचा जगावर वाईट परिणाम होत आहे. इंधन दरवाढीची नागरिकांना कोण भीती वाटत आहे. कालपासून पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी आणि शेतमालाला त्याचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील JNPT बंदरात अनेक कंटनेर उभे असल्याचा दावा करण्यात येत होता. महाराष्ट्रातून द्राक्ष, केळी आणि कांदा उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धचा महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ व द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दिली. सध्या द्राक्ष निर्यात सुरळीत सुरू असून बाजारभावही समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथील जेएनपीटी बंदरावर द्राक्षांचे कंटेनर अडकून सुमारे 200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या चर्चेबाबत बोलताना भोसले यांनी सांगितले की, बंदरावर कांदा, तांदूळ, केळी व इतर शेतीमालाच्या कंटेनरची गर्दी झाल्याने काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र परिस्थिती आता सुरळीत होत असून मोठ्या नुकसानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा आकडेवारी संघटनेकडे आलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या




















