बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच; नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्रींचा मोठा निर्णय
Nashik News : शहरात बांधकाम परवानग्या ऑनलाईनच द्याव्या, अशा सूचना नाशिक मनपा आयुक्त मनीषा खात्री यांनी नगररचनाचा विभागाला दिल्या आहेत.
नाशिक : शहरात बांधकाम परवानग्या ऑनलाईनच द्याव्या, अशा सूचना नाशिक मनपा आयुक्त मनीषा खात्री (Manisha Khatri) यांनी नगररचना विभागाला (Town Planning Department) दिल्या आहेत. नगररचना विभागाकडून विकासकांना याआधी ऑफलाईन बांधकाम परवानग्या दिल्या जात होत्या. आता नगररचना विभागास सर्व परवानग्या ऑनलाईनच असे परिपत्रक मनीषा खात्री यांनी काढले आहे. महापालिकेतील अफरातफर टाळण्यासाठी मनपा आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आता नाशिकमध्ये रंगली आहे.
शासनामार्फत बीपीएमएस कार्यप्रणाली विकसित करण्यात आली असून त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने ऑफलाईनद्वारे परवानग्या दिल्या जात होत्या. मात्र आता ऑनलाईनच परवानग्या देण्याच्या सूचना आयुक्त खत्री यांनी दिल्या आहे. नगररचना विभागाकडून त्या प्रणालीव्दारे विकसन प्रस्ताव मंजुरी दिली जाते. परंतू या प्रणालीव्दारे प्रस्ताव सादर करताना काही प्रकरणांमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यास अशी प्रकरणे विकासकांनी मागणी केल्यानुसार आयुक्तांची मान्यता घेऊन ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यास परवानगी देण्यात येत होती. मात्र शासनामार्फत विकसित कार्यप्रणालीद्वारेच विकसन परवानगी प्रस्ताव मंजुरीची कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्याबाबत मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ऑफलाईन परवानगी चालणार नसून सर्व प्रकराच्या विकसन परवानगीबाबतचे प्रस्ताव फक्त ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावे असे आदेश दिले आहेत.
विकसन परवानगीचे प्रस्ताव ऑनलाईनच सादर करावे
एकिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- 2029 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार विकसन परवानगी देण्यासाठी शासनाने बीपीएमएस कार्यप्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे एक जानेवारी 2025 पासून नगरनियोजन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या विकसन परवानगीबाबतचे प्रस्ताव फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आयुक्त खत्री यांनी सूचित केले आहे. महापालिकेतील अपरातफर टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.
आणखी वाचा