Nana Patole Nashik : राज्यकर्त्यांची साथ असल्याशिवाय ड्रग्सचे कारखाने होऊ शकत नाही, नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप
Nashik News : राज्यकर्त्यांचा सहभाग असल्याशिवाय ड्रग्सचे कारखाने (Drug factory) होऊ शकत नाही असा आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शिंदे गाव आणि वडाळा यासारख्या ग्रामीण भागात ड्रग्स तयार करण्याचे कारखाने कार्यरत होते, हे संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. राज्यकर्त्यांचा सहभाग असल्याशिवाय ड्रग्सचे कारखाने (Drug factory) होऊ शकत नाही, असा आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच शासनाच्या आणि व्यवस्थेच्या आशीर्वादाने ड्रग्ज माफिया ललित पाटील पळाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी सरकारवर केला.
ललित पाटीलने (Lalit Patil) ससून रुग्णालयातून (Sasun Hospital) केलेले पलायन आणि त्यानंतर काही दिवसातच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना उध्वस्त केल्यानंतर ड्रग्सचे (Drug Racket) नाशिक कनेक्शन हा मुद्दा राज्यभर गाजत असतांनाच काँग्रेस या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. ड्रग्समुक्त नाशिक करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या (Nana Patole) उपस्थितीत मेनरोडवर सोमवारी सायंकाळी ड्रग्स हटवा, नाशिक वाचवा आंदोलन करण्यात आले. हातात नाशिक वाचवा, ड्रग्स हटवा फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या आंदोलनानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ललित पाटील प्रकरणावरून पुरावे नष्ट करण्याचा प्रकार सुरू झाला असून खूप गोष्टी पुढे येत आहेत. तो आरोपी आता भेटणार की नाही? असा सवालच पटोलेंनी यावेळी उपस्थित केला आहे. राज्यकर्त्यांचा सहभाग असल्याशिवाय ड्रग्सचे कारखाने होऊ शकत नाही असंही त्यांनी म्हंटल आहे.
नाना पटोले यावेळी म्हणाले की, समाजविघातक काम करणारी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. तरुण पिढी बरबाद नाही झाली पाहिजे, असे काम सुरू करण्याची गरज आहे. मात्र दुसरीकडे अशा माफियावृत्तीला सरकार, पोलीस पाठिंबा देते आहे. यासाठी काँग्रेस सरकार विरोधात आवाज उठविणार असून याच पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू केले आहे. ललित पाटील हा शासनाच्या आणि व्यवस्थेच्या आशीर्वादानेच फरार झाला आहे. या संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा प्रकार सुरू झाला आहे, खूप गोष्टी पुढे येत आहेत. तो आरोपी आता भेटणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. मात्र विधानसभेच्या अधिवेधनात हे मुद्दे येणारच आहेत, याविरोधात जनचळवळ सुरू झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. तसेच आमच्याकडे पण काही माहिती आहे, पण योग्यवेळी मांडणार आहेच. मात्र या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचे दिसून येत असून ड्रग्सचा एक दिवसाचा नाही अनेक दिवसांपासून कारखाना आहे. आणि हे राज्यकर्त्यांचा सहभाग असल्याशिवाय होऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
टोल घोटाळा संपला पाहिजे
दरम्यान 2014 साली टोलमुक्त (Toll) महाराष्ट्र भाजपने (BJP) म्हंटल होतं. मात्र आजही अनेक ठिकाणी रस्ते खराब असतांनाही टोल घेतले जातात, तसा नियम नाही. टोलमाफिया आणि सत्ताधारी लोकं यांच्यामुळे जनतेची लूट होते आहे हे तेवढंच खरं आहे. एकटा टोलचं नाही तर औषध आणि ईतरही बाबतीत अनेक घोटाळे असल्याचे सांगत भ्रष्टाचारी व्यवस्था राज्यात आणि केंद्रात असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो शेतकऱ्यांना बरबाद करण्याचा पण घोटाळा होत आहे. तसेच नाशिकच्या ड्रग्ज प्रकारणा संदर्भात काँग्रेसकडून नाशिक येथे " नाशिक बचाव" आंदोलनाची सुरुवात केली. आध्यात्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहराला कलंकित करणारा 600 कोटीच्या एमडी ड्रग्स चा साठा सापडला. नाशिक जिल्ह्यातील शिंदे गाव आणि वडाळा यासारख्या ग्रामीण भागात ड्रग्स तयार करण्याचे कारखाने कार्यरत होते, हे संपूर्ण नाशिक जिल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे.
इतर महत्वाची बातमी :