Nashik Tree Collapsed : नाशिकमध्ये पुन्हा धावत्या रिक्षावर झाड कोसळले, 'त्या' घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली!
Nashik Tree Collapsed : नाशिकच्या (Nashik) पंचवटी (Panchavti) परिसरात दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार (Krushi Utpanna Bajar Samiti) समितीसमोर भलामोठा वटवृक्ष एका चालत्या ऑटोरिक्षावर कोसळला.
Nashik Tree Collasped : नाशिकमध्ये (Nashik) रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकेदायक झाडांचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. काही दिवसांपूर्वी सातपूर (Satpur) परिसरात एका धावत्या रिक्षावर झाड कोसळल्याने रिक्षाचालक आणि प्रवासी महिलेचा मृत्यू झाला होता आणि ही घटना ताजी असतांनाच आज या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली आहे.
नाशिकच्या पंचवटी (Panchavti) परिसरात मार्केट यार्ड (Market Yard) जवळ वडाचे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भलामोठा वटवृक्ष एका चालत्या ऑटोरिक्षेवर कोसळला. यात सुदैवाने रिक्षेतील प्रवासी महिला आणि रिक्षाचालक थोडक्यात बचावले असून चालक किरकोळ जखमी झाला तर रिक्षासह, ऍक्टिव्हा आणि एका टपरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ही वाहने बाहेर काढत झाड रस्त्यावरुन हटवण्याचे काम अग्निशमन विभागाकडून सध्या सुरू आहे.
शहरातील गेल्या काही अनेक ठिकाणी झाड कोसळलण्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आयटीआय सिग्नलजवळ एका रिक्षावर झाड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज वर्दळीचे ठिकाण आलेल्या पंचवटी मार्केट यार्ड परिसरात जुने वडाचे झाड कोसळले आहे. याच वेळी एक प्रवासी रिक्षा काही प्रवाशांना घेऊन जात होती. झाडाच्या फांद्यांमध्ये रिक्षा दाबली गेली आहे. या घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या प्रसंगावधानाने रिक्षातील एका महिलेला वाचविण्यात आले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
दरम्यान झाड कोसळल्यानंतर वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच काही वेळानंतर अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अग्निशमन दलासह पंचवटी पोलीस आणि स्थानिकांनी पुढाकार घेत वाहून सुरळीत केली. त्यानंतर अग्निशमन दलाने पडलेले झाड कटरच्या साहाय्याने तोडून ते रस्त्यापासून बाजूला केले आहे. सध्या येथून वाहतूक सुरळीत असल्याची प्रशासनाने दिली आहे.
शहरातील झाड कोसळणे नित्याचे...
काही महिन्यापूर्वी लेखानगर परिसरात गुलमोहराचे झाड चालत्या दुचाकीवर पडून एकाचा मृत्यू, झाला होता. तर काही दिवसांपूर्वी शहरातही आयटीआय सिग्नलजवळ नाशिक सातपूरकडे जात असलेला रिक्षावर अचानक भलं मोठा वृक्ष कोसळला. या दुर्दैवी अपघातात रिक्षाचालकासह एका प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.