(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Accident : नाशिकमध्ये रिक्षावर झाड कोसळून दोन जणांचा करुण अंत, शहरातील दुसरी घटना
Nashik Accident : नाशिक (Nashik) शहरातील आयटीआय सिग्नलजवळ (ITI Signal) रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालकांसह (Auto driver) महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Nashik Accident : नाशिकमध्ये रिक्षावर झाड कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. नाशिकच्या आयटीआय सिग्नजवळ हा अपघात झाला. यामध्ये रिक्षाचालक व एक प्रवाशी महिलेचा करुण अंत झाला. या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
नाशिक सातपूरकडे जात असलेला रिक्षा आयटीआय सिग्नलजवळून जात असताना अचानक रिक्षावर भलं मोठा वृक्ष कोसळला. या दुर्दैवी अपघातात रिक्षाचालकासह एका प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका तातडीने दाखल झाली. तसेच पोलिसांसह अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. मात्र झाड रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचालक आणि महिला दोघेही अडकून होते. या दोघांना काढण्यासाठी स्थानिक नागरिक सह पोलिसांनी मदतकार्य केले. बरीच उशिराने या दोघांना काढण्यात आले.
शैला शांतीलाल पाटणी (५२, गंजमाळ), पोपट सोनवणे (५२, शिवाजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर दुर्दैवी घटना झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. शिवाय नातेवाईकांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. सध्या या दोघाही मृतांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.
जीवघेणी झाडे, प्रशासन करतंय काय?
दरम्यान पावसाळ्यात झाड कोसळल्याच्या अनेक घटना समोर येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेळीच पावसाळापूर्वी या झाडांची छाटणी करण्यात येते. अंतर अनेकदा छाटणी करून वादळी पावसात हि झाडे उन्मळून पडतात. विशेष म्हणजे घटना घडल्याच्या सुमारास पाऊसही नव्हता. मात्र झाड कोसळले. अशा झाडांची प्रशासनाकडून दाखल घेऊन वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिकांना अशा प्रकारे जीव घेणे ठरणार नाही.
शहरातील दुसरी घटना..
काही दिवसांपूर्वी लेखानगर परिसरात गुलमोहराचे झाड चालत्या दुचाकीवर पडून एकाचा मृत्यू, झाला होता. गेल्या दोन चार दिवसापासून शहरासह जिल्ह्यात उन्ह वाढले होते. त्यातच सोमवारी देवळा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मनमाड शहराला पावसाने झोडपून काढले. तर परवा नाशिक शहरासह चांदवड तालुक्यात वादळी पावसाने सलामी दिली. काल दुपारपासूनच वातावरणात बदल झाल्याचे जाणवले होते. अशातच काल सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची जोरधार सुरु होती. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमाने, भाजीविक्रेते यांना धावपळ करावी लागली.