एक्स्प्लोर

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर मतमोजणीत अवैध मतांचा ढीग, सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात कांटे की टक्कर!

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत तांबे आणि पाटील यांच्या टेबलावर मतपत्रिकांची बरसात होते आहे.

Nashik Graduate Constituency : राज्यातील पाच जागांच्या निवडणूक निकालासह नाशिक पदवीधर निवडणुक (Nashik Graduate Constituency) मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यामध्ये चुरस सध्या पाहायला मिळते. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागले असून या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी होतात की शुभांगी पाटील विजयी होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सत्यजित तांबे, शुभांगी पाटील दोघेही अपक्ष उमेदवार असले तरी शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढवत आहेत. 

दरम्यान अडीच वाजता मतमोजणीला (Vote Couting) सुरुवात झालेली आहे. पहिल्या फेरीचा मतमोजणी आता केली जात आहे.  सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अकरावा नंबर असून शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा अनुक्रमांक हा चौदावा आहे. दरम्यान दोन्ही ठिकाणी मतपत्रिका मोठ्या प्रमाणावर पडत असून तर 28 टेबलांपैकी 17 वा नंबर आहे. तो अवैध म्हणजेच बाद मतांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर मतपत्रिका पडत आहेत. नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातील 16 उमेदवारांपैकी फक्त दोन उमेदवारांमध्ये काटे की टक्के राहणार असून यामध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात हा सामना बघायला मिळणार आहे. तर दुसरीकडे पहिल्या फेरीतील मतमोजणी दरम्यान अवैध मतांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने मतांचा कोटा पूर्ण होऊ शकणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. 

सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही तासांमध्ये पहिल्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीला सर्व मतपेट्या एका सरमिसळ हौदात टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या वेगळ्या करण्यात येऊन जवळपास 28 टेबलांवर ठेवण्यात आल्या. जवळपास एक हजार मत पत्रिका त्या त्या टेबलावर ठेवण्यात आल्या. या पत्रिकांपैकी आता वीस वीस चे गठ्ठे केले जात आहेत. एक गठ्ठा पूर्ण झाल्यानंतर दुसरा गठ्ठा मतमोजणीसाठी काढण्यात येत आहे.  त्याचबरोबर वैध आणि अवैध मत कुठले आहेत. हे देखील पाहिले जात आहे. एक फेरी म्हणजेच पहिली फेरी पूर्ण होण्यासाठी जवळपास एक ते दीड तासांचा कालावधी हा लागत आहे. त्यामुळे नाशिक पदवीधरचा निकाल हा उशिरापर्यंत लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

बाद मतपत्रिकांची संख्या अधिक

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. सुरुवातील मतपत्रिकांची छाननी करण्यात आली. त्यानंतर मतपत्रिकांचे वेगवेगळे गठ्ठे करून 28 टेबलांवर ठेवण्यात आले आहेत. पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यातील पहिल्या काही मतपत्रिकांचा अंदाज घेतला असता सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यामध्ये अटीटीची लढत होत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. दरम्यान, यासोबतच बाद मतपत्रिकांची संख्या अधिक असल्याने आता कोटा किती निश्चित होतो? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोटा निश्चितीनंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

निवडणूक मतमोजणी केंद्रावर गोंधळ 

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. उमेदवार प्रतिनिधी जास्त झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी उमेदवार प्रतिनिधीमधेच बाचाबाची झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या वेळी टेबल क्रमांक 13 वर गोंधळ झाल्याने महसूल आयुक्तांनी पोलिसांना पाचारण करण्यात आले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget