एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik News : शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे आले आमनेसामने, मात्र एकमेकांशी बोललेही नाहीत!

Nashik News : नेवासा येथील विवाहसोहळ्या प्रसंगी शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे हे आज समोरासमोर आले.

Nashik News : नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) उमेदवारांचा प्रचार दौरे सुरु आहेत. अशातच दोन प्रमुख उमेदवार असलेले शुभांगी पाटील (Shubhangi Patil) आणि सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे आज समोरासमोर आले. मात्र या दोघांनीही एकमेकांना कानाडोळा करत निघूनही गेले. अहमदनगर जिल्ह्यातील एका शाही विवाहसोहळ्याला या दोन्ही उमेदवारांनी हजेरी लावली, त्यावेळी हा प्रसंग घडला. 

नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत सध्या टशन पाहायला मिळत असून उमेवारांचा प्रचार जोरदारपणे सुरु आहे. यात शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. अशातच हे दोघे एकाचवेळी एकाच ठिकाणी समोरासमोर आले, मात्र एकमेकांशी बोललेही नाहीत. निमित्त होते, माजी मंत्री शकंरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या मुलाच्या विवाह सोहळा. गडाख यांचे पुत्र उदयन गडाख आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या निवेदिता यांचा विवाह सोहळा आज नेवासामध्ये पार पडला. यावेळी शरद पवार, आदित्य ठाकरे, राधाकृष्ण विखे, शरद पवार आदींची लग्नसोहळ्याला उपस्थिती लावल्याचे दिसून आले. याच लग्न सोहळ्यात दोन उमेदवाराची गाठभेट झाली, मात्र एक रुपयाचाही संवाद या दोघांमध्ये झाला नाही, दोघांनीही मौन पाळत विवाह सोहळ्यातून काढता पाय घेतला. 

नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे तर सत्यजित तांबे यांना अनेक शिक्षक संघटनासह राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे. सध्या या दोघांत नाशिक पदवीधरची लढत होणार हे निश्चित आहे. त्यामुळेच माघारीचा दिवस संपल्यानंतर मतदारसंघात दोघेही उमेदवार प्रचार दौरे करत आहेत. अशातच आज अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांच्या मुलाचा विवाह चंद्रशेखर घुले यांची कन्या निवेदिता हिच्याशी पार पडला. या सोहळ्यात अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या लग्नात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार शहाजी बापू पाटील आदींसह लोकप्रतीनिधी उपस्थित होते. 

दरम्यान या सोहळ्याला उमेदवार सत्यजित तांबे यांनी हजेरी लावली. त्यांनी उभयतांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडत असताना त्याचवेळी उमेदवार शुभांगी पाटील. या लग्नस्थळी पोहचल्या. विवाहसोहळ्याच्या प्रवेशद्वारावरच या दोघांची समोरासमोर भेट झाली. मात्र एकमेकांसमोर येऊन काहीच बोलले नाहीत. दरम्यान दोन्ही उमेदवार दिवसरात्र एक करून करून मदारसंघात फिरत आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने घरोघरी जाऊन प्रचार सुरु आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget