एक्स्प्लोर

Nashik Fire : नाशिकमधील म्हसरुळ टेक वस्तीत आगीचा भडका, चार कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त, अग्निशमनचा कर्मचारी अत्यवस्थ 

Nashik Fire : नाशिक (Nashik) शहरातील म्हसरूळ भागातील टेक वस्तीत दुपारच्या सुमाराच्या आग लागण्याची घटना घडली.

Nashik Fire : नाशिक (Nashik) शहरात लोकवस्ती वाढत असल्याने आग लागण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. यातून अनेकदा मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागते. अशातच आज दुपारी शहरातील जुन्या नाशिकमधील म्हसरुळ टेक वस्तीत आग लागण्याची घटना घडली. आज दुपारच्या सुमाराच्या लागलेल्या आगीत चार घरे जळून भस्मसात झाली आहे. 

आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील जुने नाशिक भागातील म्हसरुळ (Mhasrul) टेक परिसरात ही घटना घडली आहे. आज दुपारी अचानक काही जुन्या घरांनी पेट घेतला आणि क्षणात आगीचं रुपांतर झालं. यात आगीत (Fire) जवळपास चारही घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत एक जण जखमी झाला. तर आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी आलेल्या एका अग्निशमन दलाच्या (Fire Department) कर्मचाऱ्याचा श्वास गुदमरल्याने अत्यवस्थ झाल्याचा प्रकार घडला. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी दाखल केल्याने अनर्थ टळला. 

चार घरांचं जळून नुकसान

म्हसरुळ टेक वस्तीत राहणारी कोमल पवार ही घरात काहीतरी काम करत होती. अचानक काहीतरी जळाल्याचा वास आला. तिने ही बाब कुटुंबियांना सांगितली. लागलीच आसपासचा वीजपुरवठा (Power Supply) देखील खंडित झाल्याने पवार कुटुंबीय बाहेर पडले. साळुंखे कुटुंबीयांनाही घरात धूर निघत असल्याचे आढळून आले. त्यांनीही घराच्या बाहेर पळ काढला. कुंभकर्ण यांच्या घरात कारखाना असून तो बंद असल्याने ते घर बंद होते. इतर तीन घरांमध्ये मात्र कुटुंबीय राहत होते. बुधवार दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास म्हसरुळ टेक भागातील जुन्या घरांनी अचानक पेट घेतला. त्यात महेश पवार, सुरेश साळुंके, सागर पेंढारकर, कुंभकर्ण यांच्या चार घरांचं जळून नुकसान झाले.

दरम्यान आग लागली, त्यावेळी घरांमध्ये दोन लहान मुले, दोन महिला आणि दोन पुरुष असे सहा जण होते. घटना वेळीच लक्षात आल्याने ते घरातून बाहेर पडल्याने अनर्थ टाळला. ते बाहेर पडतात आगीने रौद्ररुप धारण केले. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखीच वाढली. अग्निशामक विभागास माहिती मिळताच अवघ्या काही वेळात बंब घटनास्थळी दाखल झाले. येथील अरुंद गल्ली आणि जुन्या वाड्यांचे वाढीव बांधकामामुळे बंब घटनास्थळी पोहोचण्यास कसरत झाली. 

दोन तासानंतर आगीवर नियंत्रण 

टेक वस्तीच्या आजूबाजूला वस्ती असल्याने दाटीवाटीचा परिसर आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत होते. शेवटी घटनास्थळापासून लांब बंब उभे करुन बंबाच्या पाईपला अतिरिक्त पाईप जोडून आगेवर पाण्याचा मारा करण्यात आला. दोन तासानंतर आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अग्निशामक विभागाचे अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत मुख्यालय दोन, पंचवटी एक आणि के के वाघ अग्निशामक केंद्र एक असे चार बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole Full PC : शिवरायांबद्दल चुकीचं बोलणाऱ्याला कुत्रा म्हटलं पाहिजे,सोलापुरकरांवर हल्लाबोल
Nana Patole Full PC : शिवरायांबद्दल चुकीचं बोलणाऱ्याला कुत्रा म्हटलं पाहिजे,सोलापुरकरांवर हल्लाबोल
भारताचा इंग्लंडवर मालिका विजय पण संजू अन् सूर्याची जोडी फ्लॉप, चुकांमधून धडा घ्या, आर. अश्विनचा लाख मोलाचा सल्ला
इंग्लंडविरुद्ध संजू सॅमसन अन् सूर्यकुमार यादव फ्लॉप, चुकांमधून धडा घ्या, अन्यथा... आर. अश्विनचा लाखमोलाचा सल्ला
Laxman Hake: ओबीसी मंत्र्याला मिडिया ट्रायल करुन धमकावले जात असेल तर समाज रस्त्यावर उतरेल, धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाके मैदानात
ओबीसी मंत्र्याला टार्गेट केल्यास संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल, धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाके मैदानात
Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole Full PC : शिवरायांबद्दल चुकीचं बोलणाऱ्याला कुत्रा म्हटलं पाहिजे,सोलापुरकरांवर हल्लाबोलABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 05 February 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सShivray Agra Escape History : आग्र्याहून सुटका,सत्य की दंतकथा? इतिहास अभ्यासकानं सगळं सांगितलंJalna Girl Case : आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे घरच्यांनी मुलीला साखळ दंडाने बांधून डांबलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole Full PC : शिवरायांबद्दल चुकीचं बोलणाऱ्याला कुत्रा म्हटलं पाहिजे,सोलापुरकरांवर हल्लाबोल
Nana Patole Full PC : शिवरायांबद्दल चुकीचं बोलणाऱ्याला कुत्रा म्हटलं पाहिजे,सोलापुरकरांवर हल्लाबोल
भारताचा इंग्लंडवर मालिका विजय पण संजू अन् सूर्याची जोडी फ्लॉप, चुकांमधून धडा घ्या, आर. अश्विनचा लाख मोलाचा सल्ला
इंग्लंडविरुद्ध संजू सॅमसन अन् सूर्यकुमार यादव फ्लॉप, चुकांमधून धडा घ्या, अन्यथा... आर. अश्विनचा लाखमोलाचा सल्ला
Laxman Hake: ओबीसी मंत्र्याला मिडिया ट्रायल करुन धमकावले जात असेल तर समाज रस्त्यावर उतरेल, धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाके मैदानात
ओबीसी मंत्र्याला टार्गेट केल्यास संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल, धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाके मैदानात
Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shantanu Naidu :रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूवर टाटा ग्रुपनं सोपवली मोठी जबाबदारी, पोस्ट शेअर करत दिली अपडेट 
रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडू सध्या काय करतो? टाटा ग्रुपकडून मोठी जबाबदारी मिळताच म्हणाला...
Devendra Fadnavis in Beed: देवाभाऊ आज बीडच्या दौऱ्यावर, पण धनंजय मुंडे गैरहजर राहणार, समोर आलं महत्त्वाचं कारण
देवाभाऊ आज बीडच्या दौऱ्यावर, पण धनंजय मुंडे गैरहजर राहणार, समोर आलं महत्त्वाचं कारण
Maharashtra Weather Update: उन्हाच्या झळा!  प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण होणार, राज्यात तापमानाचा अंदाज काय?
उन्हाच्या झळा! प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण होणार, राज्यात तापमानाचा अंदाज काय?
Alia Bhatt Pics: कधी गोल्डन गर्ल, तर कधी फ्लोरल ड्रेसमधला रेट्रो लूक; मम्मा आलियाच्या सौंदर्याची बातच काही और...
कधी गोल्डन गर्ल, तर कधी फ्लोरल ड्रेसमधला रेट्रो लूक; मम्मा आलियाच्या सौंदर्याची बातच काही और...
Embed widget