एक्स्प्लोर

Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?

Who Is Rahul Kardile IAS : प्रशासनात काम करताना शांत आणि संयम ठेवणाऱ्या तसेच लोकांना केंद्रस्थानी ठेऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये राहुल कर्डिले यांचा समावेश होतो. 

मुंबई : राज्यात नवीन सरकार आल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच आहे. आताही 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश (Maharashtra IAS Transfer List) काढण्यात आले आहेत. त्यामध्ये महिनाभरापू्र्वीच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा (CIDCO Navi Mumbai) पदभार घेतलेल्या राहुल कर्डिले (Rahul Kardile IAS) यांची आता पुन्हा नांदेडचे जिल्हाधिकारी (Nanded Collector) म्हणून बदली झाली आहे. कोणताही वाद नाही आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामाचे नागरिकांमध्ये असलेले समाधान यामुळे 'मिस्टर क्लीन' अशी त्यांची इमेज आहे. राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगरचे असून 2015 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Who Is Rahul Kardile IAS : कोण आहेत राहुल कर्डिले? 

राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाणगावचे. त्याच ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण झालं. तर पार्थडीमधील करंजी या गावात त्यांचे माध्यमिक शिक्षण झालं. अहिल्यानगरच्या विखे महाविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. 

राहुल कर्डिले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून उपनिबंधक म्हणून निवड झाली. त्या दरम्यान त्यांनी यूपीएससीच्या तीन मुलाखती दिल्या होत्या. पण त्यामध्ये अपयश आलं. मात्र चौथ्या प्रयत्नात ते देशात 422 वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली.  राहुल कर्डिले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले यादेखील उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. 

Rahul Kardile IAS : कोणताही वाद नाही, नागरिकांमध्ये समाधान

अत्यंत साधी राहणी आणि मनमिळावू असा राहुल कर्डिले यांचा स्वभाव आहे. मित्रांमध्ये ते ज्या पद्धतीने वागतात त्याच पद्धतीने काम घेऊन आलेल्या सर्वसामान्यांशी वागतात. त्यामुळेच त्यांच्या कामाबद्दल कोणताही वाद निर्माण झाला नाही. तसेच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या नागरिकांमध्ये एक प्रकारचं समाधान दिसून येतं. 

Rahul Kardile Transfer : आतापर्यंत कोणत्या ठिकाणी काम केलं? 

राहुल कर्डिले यांची पहिली पोस्टिंग परभणीमध्ये होती. ट्रेनी आयएएस म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आलं. त्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. नंतरच्या काळात त्यांची एमएमआरडीएच्या (MMRDA) सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

चंद्रपूरमध्ये उल्लेखनीय काम

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी केलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी उल्लेखनीय काम केलं. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यातील लोकांमध्ये आरोग्याच्या आणि इतर सरकारी योजना जास्तीत जास्त कशा पोहोचतील यासाठी त्यांनी काम केलं. 

वर्ध्यामध्ये अनेक योजना राबवल्या

राहुल कर्डिले यांची वर्धा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयामध्ये ई-ऑफिस (E Office Wardha) प्रणाली सुरू केली. त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जलद, पारदर्शक आणि ठराविक कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ई ऑफिस प्रणाली सुरू करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला.

राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना घरोघरी सेवा देण्यासाठी सेवादूत हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला. त्या माध्यमातून नागरिकांना 90 महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. आरटीएस पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने या सेवा पुरवण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील 96 दुष्काळी गावांमध्ये नाल्यांचे खोलीकरण तसेच काठावर बांबू लागवड करण्यात आले. 

नाशिकमध्ये बदली आणि रातोरात स्थगिती

जिल्हाधिकारी म्हणून शांतपणे आणि प्रामाणिकपणे करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक असलेले राहुल कर्डिले यांच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील खुश होते. त्यामुळेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बदलीचे आदेश निघाले आणि कर्डिले यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. पण जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या विरोधामुळे त्यांच्या नियुक्तीला रातोरात स्थगिती मिळाल्याची चर्चा आहे. नंतर कर्डिले यांची नवी मुंबईतील सिडकोच्या सहव्यवस्थापक पदावर बदली करण्यात आली. 31 डिसेंबर 2024 रोजी कर्डिले यांनी सिडकोचा पदभार घेतला.

सिडकोतून महिन्याभरात बदली

सिडकोच्या सहव्यवस्थापक पदाचा पदभार घेऊन एक महिना उलटला नाही तर कर्डिले यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे लोकांना केंद्रस्थानी ठेऊन काम करणारा एक प्रामाणिक अधिकारी नांदेडला मिळाला आहे. 

परिस्थिती कोणतीही असो, अत्यंत शांत आणि संयमाने त्याला सामोरं जाणं ही राहुल कर्डिले यांची खासियत. प्रशासनात काम करतानाही त्यांनी हे तत्व सोडलं नाही. त्यामुळेच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी कोणताही गाजावाजा न करता काम करतात. 

ही बातमी वाचा: 

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics मुलगा 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेतो, हे वडिलांना माहित नाही?', दानवेंचा सवाल
Farmers Protest : 'सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही' — Uddhav Thackeray
MVA Rift: ‘सन्मान दिला तरच आघाडी, अन्यथा आम्ही सक्षम’, राष्ट्रवादीचे Salil Deshmukh यांचा Congress ला इशारा
Annasaheb Patil Mahamandal अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईटबंद, लाभार्थ्यांची अडचण, तरुणांना फटका
Manoj Jarange Conspiracy: 'मला संपवण्यासाठी अडीच कोटींची सुपारी', मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Date: शुभ मुहूर्ताची सनई वाजली गं... रश्मिका, विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली; आलिशाल राजवाड्यात शाही विवाहसोहळा?
शुभ मुहूर्ताची सनई वाजली गं... रश्मिका, विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली; आलिशाल राजवाड्यात शाही विवाहसोहळा?
Sulakshana Pandit Passes Away: बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
Embed widget