Pravin Tarde : 'बलोच'मध्ये दिसणार मराठ्यांची शौर्यगाथा! प्रवीण तरडेंच्या नजरेत धगधगणारी आग; अंगावर शहारे आणणारं मोशन पोस्टर आऊट
Pravin Tarde : प्रवीण तरडेंचा 'बलोच' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Pravin Tarde Marathi Movie Baloch : पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या 'बलोच' (Baloch) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे. 5 मे 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
'बलोच' या सिनेमात प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि अशोक समर्थ (Ashok Samarth) मुख्य भूमिकेत आहेत. नुकतचं या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मोशन पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांच्या नजरेत मराठ्यांना मिळणाऱ्या वागणुकीविरोधात धगधगणारी आग आणि सूड भावना दिसत आहे. तर मराठ्यांवर अत्याचार करणारा अफगाणी आहे. पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे, जी 'बलोच'च्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
'बलोच' या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक जनार्दन पवार म्हणाले,"बलोच ही एक सकारात्मक गोष्ट आहे. यापूर्वी आपण पानिपतबद्दल ऐकलं आहे, ते केवळ पराभवाबद्दलच आहे. मात्र पानिपतच्या युद्धानंतर जेव्हा गुलामीच्या अवस्थेत असताना पुन्हा एकत्र येणे, संघर्ष करणे, ही गोष्ट प्रामुख्याने दाखवण्यात आली आहे. पानिपतचे युद्ध हे पराभव नसून शौर्य होते. हा सिनेमा पाहिल्यावर हा अभिमान प्रेक्षकांना जाणवेल आणि पानिपतकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी मला आशा आहे."
'बलोच'मध्ये काय पाहायला मिळणार? (Baloch Movie Story)
आजवर देशासाठी लढलेल्या अनेक वीर मराठ्यांची कहाणी, लढाई रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. अशीच इतिहासातील लक्षात राहणारी लढाई म्हणजे पानिपतची. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे.
दसऱ्याच्या शुभमुर्हूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बलोच'
'बलोच' या सिनेमाची कथा, पटकथा प्रकाश पवार यांची आहे. हा सिनेमा 2023 मध्ये दसऱ्याच्या शुभमुर्हूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बलोच'च्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासातील आठवणींना उजाळा मिळणार आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी करणारा धगधगता सिनेमा म्हणजे 'बलोच'.
संबंधित बातम्या