एक्स्प्लोर
Alia Bhatt Pics: कधी गोल्डन गर्ल, तर कधी फ्लोरल ड्रेसमधला रेट्रो लूक; मम्मा आलियाच्या सौंदर्याची बातच काही और...
Alia Bhatt Glam Look Photos: आलिया भट्ट नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकनं सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेते. यावेळीही तिचे काही फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
Alia Bhatt Glam Look Photos
1/8

आलिया भट्टचं नाव बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. या अभिनेत्रीनं तिच्या आजवरच्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कामासोबतच ही अभिनेत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. जिथे ती अनेकदा ब्रँड शूटचे फोटो देखील शेअर करते.
2/8

आता अलिकडेच आलियाच्या नव्या फोटोशूटचे फोटो समोर आले आहेत. आलियानं हे फोटोशूट एका ज्वेलरी ब्रँडसाठी केलं आहे.
3/8

आलियाचे हे फोटो रिया कपूरनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये आलिया सुंदर दागिने घालून वेगवेगळ्या लूकमध्ये पोज देत आहे.
4/8

अभिनेत्रीनं हे फोटो शेअर करताना रियानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "एंजल आलिया भट्टसोबत नवं काम..." अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
5/8

यातील एका फोटोमध्ये आलिया भट्ट सी ग्रीन कलरचा फ्लोरल ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अभिनेत्रीनं तिचा लूक लहान कुरळ्या केसांनी पूर्ण केला आहे.
6/8

याशिवाय, एका फोटोमध्ये आलिया चॉकलेटी कलरच्या आऊटफिटमध्ये पोज देत आहे. गळ्यात घातलेला हिऱ्यांचा हार अभिनेत्रीच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
7/8

या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या केसांच्या बटांनी चाहत्यांनाही वेड लावलं आहे.
8/8

याशिवाय एका फोटोमध्ये आलिया भट्टचा प्रिंसेस लूक सर्वांना घायाळ करतोय. ज्यामध्ये ती सोनेरी रंगाच्या आऊटफिट्समध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 05 Feb 2025 06:46 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















