Nashik News: नाशिकच्या म्हसरूळ प्रकरणाला धक्कादायक वळण; संचालकाकडून इतर पाच मुलींवरही अत्याचार
Maharashtra Nashik News: नाशिकच्या म्हसरुळ परिसरातील ज्ञानपीठ आधार आश्रमात तीन दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर हर्षल मोरेला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
Maharashtra Nashik News: नाशिकच्या (Nashik Latest News) म्हसरुळ (Mhasrul) प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आश्रमाचा संचालक संशयित हर्षल मोरेने तब्बल पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न या निमित्ताने सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.
नाशिकच्या म्हसरुळ परिसरातील ज्ञानपीठ आधार आश्रमात तीन दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर हर्षल मोरेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आश्रमातील विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले असता पाच विद्यार्थिनींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर हर्षल मोरेवर म्हसरुळ पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
म्हसरुळ परिसरातील माने नगरमध्ये द किंग फाउंडेशनचे ज्ञानपीठ आधार आश्रम असून येथील हा धक्कादायक प्रकार आहे. येथील चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीवर आधाराश्रमाच्या संचालकाकडून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली होती. पोलिसांनी आधाराश्रमातील अन्य 15 मुलींचाही जबाब नोंदवला. त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली असून चार मुलींच्या जबाबातून त्यांच्यावरही लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. पिडीत सहा मुलींपैकी पाच मुली अल्पवयीन असल्याचे समजते. यातील एका मुलीवर एका मुलीवर ग्रामीण भागात तर पाच मुलींवर आश्रमातच अत्याचार करण्यात आले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
दरम्यान पिडित पाचही मुलींची वैद्यकिय तपासणीही करण्यात आली असून त्यांचे अहवाल शनिवारपर्यंत पोलिसांना प्राप्त झालेले नव्हते. मुलींच्या जबाबानुसार हात पाय दाबायचे आहे, असे सांगून मुलींना बोलावले जायचे आणि कोणाला सांगितल्यास बदनामी करेल आश्रमातून काढून टाकेल अशी धमकी द्यायचा आणि अत्याचार करायचा, असे मुलींनी जबाबात म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान घटनेवरून नाशिक शहरातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून खऱ्या अर्थाने शहरातील आश्रमांचे ऑडिट करण्याची वेळ आल्याचे दिसते आहे.
संशयितास बुधवारपर्यंत पोलीस कोठडी
ज्ञानदीप आधाराश्रमाचा संचालक संशयित हर्षल मोरे यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने त्यास येत्या बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी केलेल्या तपासानंतर बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (ॲट्राॅसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर अन्य चार ते पाच मुलींनीसुद्धा त्यांच्या जबाबाबत संशयित हर्षल याने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले. यानुसार म्हसरुळ पोलिसांनी संशयिताविरुद्ध बलात्कार, पोक्सोअन्वये सहा गुन्हे रात्री उशीरापर्यंत दाखल केल्याचे सुत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nashik Crime : नाशिकमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वसतिगृह चालकास बेड्या