एक्स्प्लोर
भारताचा इंग्लंडवर मालिका विजय पण संजू अन् सूर्याची जोडी फ्लॉप, चुकांमधून धडा घ्या, आर. अश्विनचा लाख मोलाचा सल्ला
Suryakumar Yadav Sanju Samosn : टी 20 क्रिकेटमधील भारताचे आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव अन् संजू सॅमसन इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरले.
आर. अश्विनचा सूर्यकुमार यादव अन् संजू सॅमसनला सल्ला
1/8

भारतानं नुकत्याच पार पडलेल्या टी 20 मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला. सूर्युकमार यादवच्या नेतृत्त्वात भारताचा हा आणखी एक मालिका विजय ठरला.सूर्यकुमारच्या नेतृत्त्वात खेळल्या गेलेल्या सर्व मालिका भारतानं जिंकल्या आहेत.
2/8

सूर्यकुमार यादवकडे भारतीय टी 20 संघाचा 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. तो 2024 मधील टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य देखील आहे.
3/8

सूर्यकुमार यादवला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत चांगली फलंदाजी करता आली नाही. पाचही टी 20 मॅचमध्ये मोठी खेळी करण्याची संधी असताना सूर्यकुमार यादवला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.
4/8

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आणि संघ व्यवस्थापनासाठी सूर्यकुमार यादवचा फॉर्म चिंतेचा विषय बनू शकतो. भारतीय संघानं जरी मालिका विजय मिळवला असला तरी सूर्यकुमार यादवची फटकेबाजी चाहत्यांना पाहायला मिळाली नाही.
5/8

भारताचा टी 20 क्रिकेटमधील सलामीवीर संजू सॅमसन देखील मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आहे. अखेरच्या सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर तो लगेचच बाद झाला.
6/8

संजू सॅमसन इंग्लंड विरुद्धच्या 5 टी 20 सामन्यांमध्ये एकाच प्रकारचा शॉट मारताना बाद झाला. संजू सॅमसन यानं पाच सामन्यात 51 धावा केल्या.
7/8

सूर्यकुमार यादवनं या मालिकेत केवळ 28 धावा केल्या. भारतानं मालिका जिंकली असली तरी सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन या दोन्ही आक्रमक खेळाडूंना या मालिकेत सूर गवसला नाही. या दोघांना टीम इंडियाचा माजी खेळाडू आर. अश्विन यानं महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
8/8

आर. अश्विन यानं या दोघांना देखील महत्त्वाचा सल्ला दिलाय, सॅमसन अशा प्रकारे बाद होत राहिला तर त्याच्या मानसकितेवर परिणाम होऊ शकतो. त्यानं वेळीच चुकांमधून धडा घेणं आवश्यक असल्याचं अश्विन म्हणाला. वेळीच धडा घेतल्यास नकारात्मक विचार डोक्यात येणार नाहीत,असा सल्ला अश्विननं दिला. सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूनं चुका सुधारायला हव्यात. त्यानं फलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे, त्याबाबत सूर्यकुमार यादवनं विचार करावा, असं अश्विन म्हणाला.
Published at : 05 Feb 2025 07:29 AM (IST)
आणखी पाहा























