एक्स्प्लोर
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध, भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे
र्थातच काल 169 मतांनी बहुमत सिद्ध केल्याने विधानसभा अध्यक्षपदाचा 'सामना' देखील महाविकास आघाडीच जिंकणार अशी दाट शक्यता होती. मात्र त्याआधीच भाजपने माघार घेतल्याने पटोले यांची निवड झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपकडून किसान कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीला काल बहुमत सिद्ध करुन पहिली परीक्षा पास झाल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या परीक्षेचा सामना करावा लागणार होता. अर्थातच काल 169 मतांनी बहुमत सिद्ध केल्याने विधानसभा अध्यक्षपदाचा 'सामना' देखील महाविकास आघाडीच जिंकणार अशी दाट शक्यता होती. मात्र त्याआधीच भाजपने माघार घेतल्याने पटोले यांची निवड झाली आहे. गुप्त मतदानाने होणारी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची महाविकास आघाडीची रणनिती असल्याची माहिती मिळाली होती. तसा प्रस्ताव आधी विधानसभेत मांडला जाण्याची शक्यता होती. मात्र आधीच अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून नाना पटोले यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता तर भाजपकडून किसन कथोरे हे उमेदवार होते. काल सरकार स्थापनेसाठी बहुमत पास झाल्यानंतर आजच्या अध्यक्ष निवडीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर आज नाना पटोलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कोण आहेत नाना पटोले? अध्यक्षपद त्यांनाच का?
- नाना पटोले काँग्रेसचे आक्रमक नेते
- 2014 साली पटोले भाजपकडून खासदार
- पटोले यांनी मोदींना विरोध करत भाजपला सोडचिठ्ठी
- मोदींविरूद्ध आक्रमक पावित्र्यासाठी प्रसिद्ध
- लोकसभा आणि विधानसभेला भाजपला थेट टक्कर देणारे नेते
- नागपूर लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टक्कर
- विधानसभा निवडणुकीत साकोली मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र डॉ, परिणय फुके यांचा पराभव
- विदर्भातील महत्वाचे नेते
- भाजपने सरकार पडण्याचा प्रयत्न केल्यास अध्यक्षांची भूमिका निर्णायक
आणखी वाचा























