एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : खुर्चीकरता उद्धव ठाकरे ओवेसींसोबत देखील जातील, शिवसेनेच्या वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबद्दल बावनकुळे यांची प्रतिक्रिया

स्वतः उद्धव ठाकरेंसोबतचे कार्यकर्तेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज आहे. त्यामुळे त्यांचे अनेक कार्यकर्ते येत्या काळात ठाकरेंची साथ सोडणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहे. सत्तेसाठी ते ओवेसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही निर्णयाने राज्यातील लोकांच्या सरकारला फरक पडणार नाही. मात्र त्यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा काही फायदाही त्यांना होणार नसून ते भीमसेना (भीम शक्ती) नव्हे तर फक्त एक गट असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. स्वतः उद्धव ठाकरेंसोबतचे कार्यकर्तेही ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज आहे. त्यामुळे त्यांचे अनेक कार्यकर्ते येत्या काळात ठाकरेंची साथ सोडणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, आम्ही लढत असलेल्या चारही जागा आम्ही जिंकू, कोकणात आम्ही मुसंडी मारली आहे. तर मराठवाडा, अमरावती आणि नागपूर येथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकची जागा अपक्ष उमेदवारांची आहे. नाशिकबद्दल पक्षस्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच कॉंग्रेसमधून निलंबित सत्यजित तांबे  यांनी भाजपकडे अजूनही समर्थन मागितलेले नसल्याचेही यावेळी बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

भाजपची साथ सोडल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अधःपतनाला सुरुवात...

उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली त्याचवेळी त्यांचे अधःपतन झाले. बाळासाहेबांच्या नावाने मते घेतली,मात्र अडीच वर्षात तैलचित्र लावलं नाही,त्यांची संकुचित वृत्ती आहे अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.  शिवसेनेची स्थापना करताना बाळासाहेबांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. बाळासाहेबांनी त्याचवेळी सांगितलं होतं मी पक्षाला कुलूप लावेल. पण काँग्रेस सोबत जाणार नाही. काँग्रेसकडून वारंवार सावरकर यांचा अपमान करण्यात येत आहे. मात्र उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करणाऱ्या सोबत जाऊन बसले. अडीच वर्ष तुम्ही सत्तेचा उपभोगही घेतला, असेही ते म्हणाले.

काल विधीमंडळात यायला हवे होते

विधानभवनातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा काल पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त हे तैलचित्र लावण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे प्रमुख राज ठाकरे, अॅड. निहार ठाकरे, स्मिता ठाकरे, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आदी उपस्थित होते. बाळासाहेब यांचे पुत्र उद्धव ठाकरे, सून रश्मी ठाकरे, नातू आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी मात्र  या सोहळ्याला उपस्थिती लावण्याचं टाळले. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, स्वतः सत्ता भोगत असताना उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तैलचित्र लावला नाही. त्यांनी फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भावनिक  साद घालून मते मिळविली. त्यांनी काल विधीमंडळात यायला हवे होते. त्यांनी संकुचित वृत्ती दर्शविली असल्याची टीकाही यावेळी बावनकुळे यांनी केली.

ही बातमी देखील वाचा...

Badshah : बादशाहला कोर्टाचे अल्टीमेटम ; 7 फेब्रुवारीपर्यंत नागपूरच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
Devendra Fadnavis Profile : बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री...  घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री... घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, आमदार तुळजापूरला पायी जाणार, नवस फेडणार
देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, आमदार तुळजापूरला पायी जाणार, नवस फेडणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Oath Ceremony Update : एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्र देण्यासाठी राजभवनवर जाणारUday Samant PC Mumbaiएकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर मंत्रिपद स्वीकारणार नाही-सामंतChampasingh Thapa on Eknath Shinde : शपथविधीपूर्वी चंपासिंह थापाची मोठी भूमिका, म्हणाले....Ekanth Shinde News : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही यावर संभ्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
Devendra Fadnavis Profile : बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री...  घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री... घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, आमदार तुळजापूरला पायी जाणार, नवस फेडणार
देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, आमदार तुळजापूरला पायी जाणार, नवस फेडणार
Ind Vs Aus 2nd Test : कॅप्टन रोहितचा प्लॅन समोर दिसताच ऑस्ट्रेलियाकडूनही मोठा फेरबदल! दोन तेजतर्रार गोलंदाजाची एन्ट्री
कॅप्टन रोहितचा प्लॅन समोर दिसताच ऑस्ट्रेलियाकडूनही मोठा फेरबदल! दोन तेजतर्रार गोलंदाजांची एन्ट्री
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Eknath Shinde DCM: उदय सामंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट, एकनाथ शिंदें म्हणाले होते, 'उपमुख्यमंत्रीपद नको, मी संघटना वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन'
एकनाथ शिंदेंच्या मनात दुसरंच होतं, शपथविधीपूर्वी उदय सामंतांचं मोठं विधान
Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
शाहू महाराजांना बाजूला करणे आम्ही खपवून घेणार नाही भाजपने चूक दुरुस्त करावी; संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा
Embed widget