एक्स्प्लोर

Nagpur Crime : मॅट्रिमोनी साईटवरील ओळख तरुणीला महागात; लग्नाचे आमिष दाखवून उकळले 6 लाख; तब्बल चार महिन्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल

Nagpur : आरोपीना स्वतः सेल्सटॅक्स इन्स्पेक्टर असल्याचे तरुणीला सांगितलं. प्रोफाईल पसंत आल्याने दोघांनी एकमेकांसोबत बोलणे सुरू केले होते. आरोपीच्या रुबाबदार बोलण्यामुळे तिचा विश्वास बसला होता.

Matrimony fraud News Nagpur : सोशल नेटवर्किंगसह आता मॅट्रिमोनी (Matrimony) वेबसाईटवरही सायबर भामट्यांकडून फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढल झाली आहे. अशीच मॅट्रिमोनी साईटवरील ओळख नागपुरातील (Nagpur Cyber Fraud) एका 29 वर्षीय तरुणीला महागात पडली आहे. आरोपीने प्रथम ओळख वाढवून विश्वास निर्माण केला आणि त्यानंतर तिच्याकडून 6 लाख रुपये उकळले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार तरुणीने वराच्या शोधात जीवनसाथी डॉट कॉम (jeevansathi.com) या मॅट्रिमोनी साईटवर प्रोफाईल तयार केला होता. आरोपीने सुद्धा याच साईटवर बनावट प्रोफाईल तयार केला होता. संतोष कावळे (वय 29 वर्षे रा. येवती मांडवा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतः सेल्सटॅक्स इन्स्पेक्टर असल्याचे आणि पुण्यात राहत असल्याचे दर्शवले होते. प्रोफाईल पसंत आल्याने एकमेकांसोबत बोलणे सुरु झाले. आरोपीच्या रुबाबदार बोलण्यामुळे पीडितेचा सहज विश्वास बसला.

वेगवेगळी कारणे सांगून त्याने पैशांची मागणी सुरु केली. युवतीनेही आयुष्याचा जोडीदार म्हणून त्याला मदत करण्यात हात आखडता घेतला नाही. जुलै ते सप्टेंबर दरम्यान थोडेथोडे करत 6 लाख रुपये दिले. यानंतरही आरोपीकडून पैशांची मागणी सुरुच होती. पैसे देण्याबाबत असमर्थता दर्शवल्यास आरोपी टाळाटाळ करत होता. यामुळे तरुणीला शंका आली. तिने प्रोफाईलबाबत खात्री केली असता सर्वच माहिती खोटी असल्याचे समोर आले. यामुळे सप्टेंबर महिन्यात पीडितेने तक्रार नोंदवली होती. पोलिसांच्या तपासात तक्रार योग्य असल्याचे निष्पन्न झाल्याने बलतरोडी पोलिसांनी (Nagpur Police) तब्बल चार महिन्यांनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

पोलिसांकडून टाळाटाळ

ऑनलाईन होणाऱ्या फसवणुकीबद्दल नागरिकांकडून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्यावर त्यासंदर्भात योग्य समुपदेशन करण्यात येत नसल्याची तक्रार अनेक नागरिकांकडून करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी दिघोरीमध्ये राहणाऱ्या एका आर्किटेक्ट तरुणीसोबत ऑनलाईन लोन अॅपद्वारे फसवणूक करण्यात आली होती. तिचे फोटो मॉर्फकरुन अश्लील फोटो तिच्या नातेवाईक आणि पालकांना पाठवण्यात आले होते. या घटनेनंतर तरुणी घाबरली आणि तिने ओळखीच्यांना हा प्रकार सांगितल्यावर एका मित्रासोबत तिने आधी प्रशासकीय इमारत येथे असलेले सायबर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली होती. मात्र त्यानंतर संबंधीत अधिकाऱ्याने तुम्ही ऑनलाईन तक्रार करा असा सल्ला देण्यात आला. तरुणी पोलीस स्टेशनमध्ये असताना तिला लोन अॅप प्रतिनिधीचा फोन आला. यावेळी तिने  पोलिसांना फोनवर त्याच्याशी बोलण्यास सांगितले असता पोलीस अधिकाऱ्याने चक्क बोलण्यासाठीही नकार दिला होता. तसेच तरुणीची तक्रार न नोंदवता तिला परत पाठवले होते, हे विशेष.

ही बातमी देखील वाचा...

नागपुरात तेरा किलो गांजासह महिलेला अटक; ट्रॅव्हल्समधून बंगळुरुला तस्करी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Nagpur HSC Paper Leak Case : नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
नागपूरच्या बारावी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच शिकवणी वर्गाच्या सराव परीक्षेत 'ती'च प्रश्नपत्रिका?
Womens Day 2026 Special Story : वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
Womens Day 2026 Success Story : इमारतीच्या गच्चीवर शेतीतील किमया; आईसह दोन बहिणींनी 1500 वर्गफुटावर फुलवली सेंद्रिय शेती
इमारतीच्या गच्चीवर शेतीतील किमया; आईसह दोन बहिणींनी 1500 वर्गफुटावर फुलवली सेंद्रिय शेती, 98 टक्के घरीच पिकतो भाजीपाला

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget