Nagpur Rain : खड्ड्यांनी वाढविली वाहतुकीची कोंडी? नागरिकांना मनस्ताप
एखाद्याला रुग्णालयात जर आपात स्थितीत पोहोचायचे असेल तर ही वाहतूक कोंडी जीवावर बेतणारी ठरू शकते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि व्यवस्थेचे नियोजन केल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.
नागपूरः शहरात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी चौकात वाहतुकीची कोंडी होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना एकीकडे त्रास सहन करावा लागत असून शहरात वाढलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. तीन दिवसांचा अपवाद गेल्या पंधरा दिवसांपासून दिवस सोडल्यास शहरात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शहरातील रस्त्यांची चाळण झालेली आहे. याशिवाय ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
वाहतुकीच्या कोंडीची ठिकाणे
अजनी ओव्हर ब्रीज, मेडिकल चौक, रामेश्वरी चौक, रहाटे कॉलनी चौक, रामदासपेठ, झाशी राणी चौक, मानस चौक, कॉटन मार्केट चौक, मुंडे चौक, जगनाडे चौक, अग्रेसन चौक, महाल, डिप्टीसिग्नल, रेल्वे क्रॉसिंग, बडकस चौक, कळमना, इतवारी, मानेवाडा चौक, दिघोरी चौक, खरबी, सक्करदरा चौक या भागात मोठी वाहतूक कोंडी होते.
अशी आहे शहराची परिस्थिती
साचलेल्या पाण्याची ठिकाणे - 44
पावसामुळे पडलेल्या खड्ड्याची ठिकाणे - 63
विकास कामे - 30
वाहतुकीची कोंडी होण्याची ठिकाणे - 19
चौकातील सखल भाग - 14
Azadi Ka Amrit Mahotsav : आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक तिरंगा हा प्रत्येक घरावर लागलाच पाहिजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरकरांना आवाहन
पोलिस म्हणतात..
शहरातील वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांची नजर आहे. त्यासाठी पॉइन्ट निर्धारित केले आहेत. या माध्यमातून वाहतूक व्यवस्था सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे त्यात व्यत्यय येत असल्याचे पोलिस विभागाचे म्हणणे आहे.
सर्वत्र वाहतूक कोंडी
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. एखाद्याला रुग्णालयात जर आपात स्थितीत पोहोचायचे असेल तर ही वाहतूक कोंडी जीवावर बेतणारी ठरू शकते. अनेक प्रमुख व वर्दळीच्या भागात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि व्यवस्थेचे नियोजन केल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. अजनी पूल, मानस चौक, सदर अंडरब्रीज, ग्रेटनाग रोड, लोहा पूल, मनिषनगर, मानसा चौक, सदर, वर्धा रोडवर अशा प्रकारे वाहतुकीची कोंडी होते. शहरातील इतर भागांमध्येही असेच चित्र आहे. दररोजचा हा प्रकार आता नागपुरकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. अशाच प्रकारचे नागरिकांचे वर्तन आहे. शहरातील समस्या संपल्यागत कुणीही याविरोधात आवाज का उठवत नाही. शहरात खुप विकास झाला तो हाच आहे का? हा प्रश्न मात्र सुजाण नागरिकांना अस्वस्थ करतोय.