Womens Day 2026 Special Story : वाघाशी दोन हात, जे कुणालाच जमलं नाही ते 'ति'नं करून दाखवलं! आक्रमक वाघाला जेरबंद करणारी पहिली महिला डॉक्टर
Nagpur News: नागपूरच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रियल चौरागडे यांनी काल म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या वाघाला यशस्वीरित्या शांत करत करत बेशुद्ध केले.

Womens Day 2026 Special Story : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी (Parshivni) तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू होता. या वाघाने माणूस मारला नसला तरीही परिसरातील अनेक गावकऱ्यांची जनावरे त्याने मारली होती. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत होती. परिसरातील राजकीय नेतृत्वाने ही वाघ जेरबंद (Tiger) करण्यासाठी वन विभागावर दबाव वाढवला होता. मात्र, एकानंतर एक जनावरे फस्त करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न होऊनही यश येत नव्हते. मात्र नागपूरच्या ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटरच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रियल चौरागडे यांनी काल म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या वाघाला यशस्वीरित्या शांत करत (Tranquilize) करत बेशुद्ध केले. त्यानंतर वन विभागाच्या टीमला त्या हिंसक झालेल्या वाघाला जेरबंद करण्यास यश आले. आहे.
विशेष बाब म्हणजे, आक्रमक वाघाला एका महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने शांत (Tranquilize) केल्याची महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. सध्या जेरबंद केलेल्या वाघाला नागपुरातील वन विभागाच्या ट्रांजिट रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
Bhandara : भंडाऱ्याच्या अड्याळमध्ये अस्वलाचा थरार! झाडावर चढून धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला तासभरानंतर केलं जेरबंद
भंडाऱ्यातून एक अतिशय थरारक बातमी समोर येत आहे. जंगलातून वाट भरकटलेल्या एका अस्वलानं थेट गावाच्या शिवारात प्रवेश केला आणि एकचं खळबळ उडाली. तब्बल तासभर या अस्वलानं झाडावर चढून धुमाकूळ घातला. ही संपूर्ण घटना भंडाराच्या अड्याळ इथं घडली. आज सकाळच्या सुमारास एका अस्वलानं जंगलाची सीमा ओलांडून थेट गावालगतच्या शेतशिवारात एन्ट्री केली. अस्वल दिसून आल्यानं ग्रामस्थांची पाचावर धारण बसली. अस्वलाला पाहताच नागरिकांनी त्याला हुसकावून लावण्यासाठी मोठा आरडाओरड केला. लोकांच्या आरडाओरडीनं भयभीत झालेल्या अस्वलानं स्वतःच्या बचावासाठी थेट एका उंच झाडाचा आश्रय घेतला आणि तिथूनचं उच्छाद मांडायला. अड्याळ वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी आणि PRT पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. तब्बल एक तासाच्या थरारानंतर आणि अथक परिश्रमानंतर, वनविभागाला त्या अस्वलाला झाडावरून खाली उतरवण्यात यश आलं. त्यानंतर अत्यंत शिताफीनं या अस्वलाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं. दरम्यान, झाडावर चढलेल्या या अस्वलाला बघण्यासाठी नागरिकचं नाही तर, शालेय विद्यार्थ्यांनीही मोठी गर्दी केली होती. जेरबंद केलेल्या अस्वलाची तपासणी करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार असल्याची माहिती वनविभागानं दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या





















