Womens Day 2026 Success Story : इमारतीच्या गच्चीवर शेतीतील किमया; आईसह दोन बहिणींनी 1500 वर्गफुटावर फुलवली सेंद्रिय शेती
Womens Day 2026 Success Story : नागपुरात दोन भगिनी आपल्या आईच्या मदतीने इमारतीच्या 1500 वर्गफुटाच्या गच्चीवर शेतीतील (Nagpur Organic Farming News) किमया करत आहे.

Womens Day 2026 Success Story : प्रत्येक कुटुंब महिन्याला हजारो रुपयांचा भाजीपाला विकत घेताना, आणि भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढल्याची ओरड होत असताना, नागपुरात दोन भगिनी आपल्या आईच्या मदतीने इमारतीच्या 1500 वर्गफुटाच्या गच्चीवर शेतीतील (Nagpur Organic Farming News) किमया करत आहे. कुटुंबाच्या गरजेचा वर्षभरातला 98 टक्के भाजीपाला दोन्ही भगिनी आणि त्यांची आई गच्चीवरच पिकवतायत. रसायनमुक्त भाजीपाला हा सर्वांसाठी चिंतेचा विषय असताना आणि तज्ञ त्याबद्दल वारंवार सावध करत असताना, ही सामान्य नागरिकांना त्याबद्दल फारसं काही करता येत नाही. मात्र, नागपुरातील दोन तरुणींनी त्यांच्या आई-वडिलांच्या मदतीने टेरेसवरील परसबागेत कुटुंबाच्या गरजेचा वर्षभरातला 98 टक्के भाजीपाला पिकवून दाखवला आहे. आज जागतिक महिला दिनाचं (Womens Day 2026 Success Story) औचित्य साधत त्यांनी राबवलेल्या अभिनव संकल्पनेबाबत अधिक जाणून घेऊया.
नागपुरात अवघ्या 1500 वर्ग फुटाच्या गच्चीवर 97 प्रकारच्या वनस्पतीच्या (97 विविध प्रकारचा भाजीपाला) माध्यमातून दिपाली आणि अंजली राठोड या भगिनी त्यांच्या आई जयश्रीच्या मार्गदर्शनाखाली भाजीपाल्यांची शेती करून दाखवत आहे... त्यांच्या परसबागेतील या प्रयोगामुळे राठोड कुटुंब बाजारातून फक्त कांदे, बटाटे आणि लसूण एवढंच भाजीपाला खरेदी करतो.. गेल्या काही वर्षात कुटुंबाचा औषधांवरील खर्च 5000 रुपयांपेक्षाही कमी असल्याचे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.
Nagpur Organic Farming News : पूर्ण सेंद्रिय पद्धतीने घरीच वर्षभराच्या गरजेचा भाजीपाल्याचं पीक
भाजीपाला पिकवताना केमिकल्सचा मारा त्यावर होत आहे. त्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी घातक तर ठरतच आहे, सोबतच त्यांच्यातला पोषणमूल्य कमी होत असल्याचं राठोड भगिनींचं म्हणणं आहे. छोट्याशा गच्चीवरील भाजीपाल्याच्या शेतीच्या आपल्या अनुभवातून राठोड भगिनींनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेती, माती आणि माणसाच्या आरोग्य संदर्भात वसंत बहार नावाचं पुस्तकही लिहिलं आहे. भाजीपाला उत्पादनासाठी केमिकल्सचा मारा अशाच पद्धतीने होत राहिला तर भविष्य किती भयावह होऊ शकतो, याचा लेखाजोखा या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे. जर चवथ्या मजल्यावरील 1800 वर्गफुटांचा गच्चीवर आम्ही पूर्ण सेंद्रिय पद्धतीने आमच्या वर्षभराच्या गरजेचा भाजीपाला पिकवू शकतो, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजेचा भाजीपाला काही अंशी नक्कीच उत्पादित करू शकतो, असा दोन्ही बहिणींचा म्हणणं आहे.
Nagpur Organic Farming: दहा वर्षात कुटुंबाचा औषधांवरील खर्च 5000 रुपयांपेक्षाही कमी
विशेष म्हणजे दिपाली आणि अंजली बहिणींच्या परसबागेतील प्रयोगामुळे राठोड कुटुंब बाजारातून फक्त कांदे, बटाटे आणि लसूण एवढंच भाजीपाला खरेदी करतो. गेल्या दहा वर्षात कुटुंबाचा औषधांवरील खर्च 5000 रुपयांपेक्षाही कमी असल्याचे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. आमच्यात कोणीही फॅमिली डॉक्टर नाही. घरचीच पिकवलेली भाजी खाल्ल्यामुळे गेल्या अनेक वर्षात कुटुंबात आजारी होण्याचा प्रमाण खूप कमी झाल्याचे राठोड कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या





















