Nagpur : 7 कि.मी.च्या प्रवासांसाठी 60 मिनिटे, आमला -नागपूर मेमूचे वेळापत्रक समजण्यापलिकडचे
पूर्वी नागपूर-आमला-नागपूर मेमू पॅसेंजर गाडीला उशीर होत असल्याची तक्रार रेल्वे मंडळापर्यंत करण्यात आली होती. नागपूर-आमला दरम्यानच्या छोट्या स्थानकांवर प्रवाशांना मेमूची एक चांगली सुविधा मिळाली आहे.
नागपूरः मुंबई-अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित स्थानकाची पाहणी करण्यासाठी अलीकडेच रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांनी मुंबईतील बीकेसीला भेट दिली होती. ही बुलेट ट्रेन ताशी 300 किमी वेगाने धावणार आहे. मात्र, नागपूर विभागातील मेमू पॅसेंजरला 7 किमीचे अंतर पार करण्यासाठी 60 मिनिटे लागत आहे. असा हा धक्कादायक प्रकार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात होत आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार गोधनी येथे 01323 आमला-नागपूर मेमू पॅसेंजर स्पेशल ट्रेनची आगमनाची वेळ संध्याकाळी 16.50 आहे, तर ही ट्रेन गोधनी येथून 7 किमी अंतरावर असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावर 17.49 वाजता पोहोचेल. म्हणजेच 7 किमीच्या प्रवासाकरिता 60 मिनिटांचा वेळ घेतल्या जात आहे.
मनमानी कारभाराचा फटका
कोविडचे संक्रमण कमी झाल्यानंतर नागपूर ते आमला मेमू सुरु करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर ही मेमू उशिरा येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या सोयींसाठी असलेली ही मेमू आता अधिक गैरसोयींची झाली आहे. रेल्वेच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र नियमित प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यापूर्वी नागपूर-आमला-नागपूर मेमू पॅसेंजर गाडीला उशीर होत असल्याची तक्रार रेल्वे मंडळापर्यंत करण्यात आली होती. नागपूर-आमला दरम्यानच्या छोट्या स्थानकांवर प्रवाशांना मेमूची एक चांगली सुविधा मिळाली आहे. मात्र गोधणी ते नागपूर दरम्यान विलंब होत असल्याने समस्या वाढली आहे.
Chandrashekhar Bawankule : ऑटोचालक, झेडपी सदस्य, आमदार ते ऊर्जामंत्री, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष
पॅसेंजरच्या फेऱ्या एकाच रेकने
प्रत्यक्षात सकाळ-संध्याकाळ नागपूर ते आमला दरम्यान धावणाऱ्या दोन्ही पॅसेंजरच्या फेऱ्या एकाच रेकने पूर्ण केल्या जात आहेत. 01203 ही गाडी नागपूरहून सकाळी 9.10 वाजता सुटल्यानंतर आमला येथे दुपारी 13.00 वाजता पोहोचते.परतीच्या प्रवासात ही ट्रेन आमला येथून दुपारी 13.30 वाजता निघून नागपूरला 17.50 वाजता पोहोचते. त्यानंतर हीच ट्रेन नागपूरवरून सायंकाळी 18.10 वाजता सुटते आणि आमला येथे रात्री 22.20 वाजता पोहोचेल. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास हीच गाडी आमला येथून पहाटे 04.10 वाजता निघते आणि नागपूरला सकाळी 08.45 वाजता पोहोचते.
प्रवाशांचा संताप
मेमू रेल्वेची एकच रेक असल्याने सर्वात मोठी अडचण म्हणजे एका मार्गावर जर काय उशीर झाल्यास संपूर्ण दिवसभराचे वेळापत्रक विस्कळीत होत असते. मुळात एकाच रेकने 3 फेऱ्या पूर्ण केल्या जाते. सततच्या विलंबामुळे प्रवाशांनी आता संताप व्यक्त केला आहे.