(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : पंतप्रधान मोदींचा मराठमोळा थाट; नागपूर दौऱ्यादरम्यान लुटला ढोलवादनाचा आनंद
PM Dhol Video : नागपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही.
PM Modi Dhol Video : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नागपूरमध्ये (Nagpur) विविध उपाययोजनांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. नागपूर दौऱ्यादरम्यान मोदींच्या स्वागतासाठी ढोलपथकाकडून ढोलवादन करण्यात आलं. यावेळी मोदींनीही ढोलवादन केलं. महाराष्ट्रातील (Maharashtra) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.
पंतप्रधान मोदी आज सकाळीच नागपुरात दाखल झाले. यावेळी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. यावेळी नागपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांचं पारंपरिक पद्धतीनं ढोल वाजवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही.
पंतप्रधान मोदींचं ढोलवादन : पाहा व्हिडीओ
#WATCH | PM Narendra Modi plays a traditional drum during his visit to Nagpur, Maharashtra today pic.twitter.com/grfI1M8Nmv
— ANI (@ANI) December 11, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठीच्या नागपूर दौऱ्यावर ढोलवादन केलं. नागपूरच्या गजवक्र ढोल ताशा पथकाला नरेंद्र मोदींच्या स्वागताचा मान मिळाला होता. ढोल ताशाच्या निनादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत झालं. यावेळी पंतप्रधान मोदींनाही ढोलवादनाचा मोह आवरला नाही. पंतप्रधान मोदी यांचा ढोल वाजवतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. आज मोदींच्या हस्ते नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या 520 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आलं.
स्वतः तिकीट काढत पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास
पंतप्रधान मोदी यांनी स्वतः तिकीट काढत नागपूर मेट्रोनं प्रवास केला. पंतप्रधानांनी नागपूर मेट्रोच्या फेज वनचं लोकार्पण केलं. त्यांनी नागपूर मेट्रोने झिरो माइल्स फ्रिडम पार्क (Zero Miles Freedom Park) स्टेशनवर मेट्रोचं तिकीट काढून फ्रिडम पार्क ते खोपरी असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी यांनी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केलं. महामार्गाचं पुढील कामही वेगाने सुरु आहे. समृद्धी महामार्गावरून नागपूर ते मुंबई हे 701 किलोमीटर अंतर केवळ आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. यातील 520 किमीचा नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्णपणे तयार झालेला आहे. त्यापुढील मार्गाचे कामही वेगाने सुरू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रासाठी 75,000 कोटी रुपयांच्या योजनांचं लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली.