(Source: Poll of Polls)
Samruddhi Mahamarg : पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, 75 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी
Samruddhi Mahamarg Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपुरात समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण पार पडलं आहे.
Samruddhi Mahamarg Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपुरात (Nagpur) समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण पार पडलं आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (Nagpur - Shirdi) या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता. कमी वेळेत नागपूर ते मुंबईचा प्रवास घडवणारा हा महामार्ग खऱ्या अर्थाने प्रवाशांना समृद्ध करणारा आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींचा 'समृद्धी दौरा'
वेगवेगळ्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आणि भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी सकाळीच नागपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
Nagpur, Maharashtra | PM Modi inaugurates the Phase-I of Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg, covering a distance of 520 Kms and connecting Nagpur and Shirdi pic.twitter.com/Vo9Xkn394P
— ANI (@ANI) December 11, 2022
75 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान लोकार्पण केलं. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर स्पीड कम्युनिकेशन मार्ग आहे. पंतप्रधान मोदी यांचं देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा II ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल.
पंतप्रधानांचा नागपूर मेट्रोने प्रवास
पंतप्रधान मोदी यांनी नागपूर मेट्रोच्या फेज दोनचं भूमीपूजन केलं आणि नागपूर मेट्रोनं प्रवास केला. मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रदान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः समृद्धी महामार्गावरच्या प्रवासाचा अनुभव घेतला. समृद्धी महामार्ग लोकार्पण कार्यक्रमानंतर पंतप्रधान एम्सच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra | PM Narendra Modi takes a ride on Nagpur Metro from Freedom Park to Khapri, interacts with students
— ANI (@ANI) December 11, 2022
PM purchased his ticket at Freedom Park station of the Nagpur Metro. pic.twitter.com/3bL34qk3LW
नागपूर - बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा
पंतप्रधानांनी नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवला. नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय वन हेल्थ संस्था, नागपूर आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. तसेच दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते मोदी एम्स नागपूर रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात येईल. पंतप्रधानांनीच जुलै 2017 मध्ये एम्सची पायाभरणी केली होती.