एक्स्प्लोर

Nagpur news : दुर्देवी! रॅकमधील किटकनाशकाचा डबा मांजरीने पाडला, अन् 15 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

Nagpur news : मांजरीने रॅकमधील तो डबा खाली पाडला, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. 

Pesticide Child Death : चिमुकल्यांची काळजी घेताना थोडीही चूक झाली तर त्याचे परिणाम किती भयंकर असतात याचा प्रत्यय नागपुरातील पाटील कुटुंबियाना आला आहे. शेतीकामासाठी आणलेला किटकनाशकाचा डबा घरातील लहानग्यांच्या हाती लागू नये म्हणून तो सावधगिरीने रॅकमध्ये ठेवला. दुर्दैवाने मांजरीने रॅकमधील तो डबा खाली पाडला, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. 

या दुर्देवी घटनेमुळे नागपुरातील समता नगरात राहणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या घरी शोककळा पसरली आहे. घरातील सर्वात लहान सदस्य, अवघ्या पंधरा महिन्याचा रियांश पाटील एका मांजरीने केलेल्या घाताला बळी पडलाय. व्यवसायाने भाजीविक्रेते असलेल्या रियांशच्या वडिलांनी कौटुंबिक शेतीकामासाठी एन्डोसल्फॉन हे कीटकनाशक घरी आणून ठेवले होते. घरातील दोन लहान मुलांच्या हाती ते लागणार नाही अशी सावधगिरी बाळगत फारसं वापरात नसलेल्या आणि शेतीची अवजारे ठेवली जातात. त्या खोलीमध्ये किटकनाशकाचा डबा एका रॅकमध्ये ठेवला होता. मात्र, एवढी सावधगिरी बाळगून ही दुर्दैवानं पाटील कुटुंबियांना गाठलेच. रॅकवर ठेवलेला किटकनाशकाचा डबा मांजरीनं खाली पाडला, त्यातील द्रव जमिनीवर पसरला. नेहमीच पाण्यात खेळण्याची आवड असलेला रियांश त्या द्रव स्वरूपातील किटकनाशकाला पाणी समजून त्यामध्ये खेळला... कीटकनाशक लागलेले हात त्याने नाकातोंडात ही लावले आणि काही वेळाने त्याला भोवळ आली. कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.  

15 महिन्याच्या रियांशच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र कीटकनाशक किंवा त्यासारखे इतर विषारी पदार्थ घरी ठेवू नये... ठेवल्यास ते लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा कुलूपबंद अवस्थेत ठेवावे असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे.  नागपुरातील या प्रकरणात पाटील कुटुंबियांनी घरातील विषारी कीटकनाशक त्यांच्या दोन लहान मुलांच्या हाती पडणार नाही... यासाठी आवश्यक काळजी घेतली होती... तो डबा मुलांपासून दूर आणि जास्त उंचीवर ठेवला होता. मात्र, मांजरीने तो डबा खाली पाडला आणि पाटील कुटुंबियांच्या लाडक्या रियांशचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे लहानग्यांची काळजी घेताना किती सावधगिरी आवश्यक आहे हेच या घटनेतून समोर आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget