एक्स्प्लोर

Nagpur Covid Testing Centers : येथे करा निःशुल्क कोव्हिड चाचणी

Nagpur Covid : शहरात कोव्हिड रुग्णांच्या संख्येत वाढ आहे. त्यामुळे नागरिकांना थोडेही कोरोनाचे लक्षण असल्यास त्यांनी मनपाच्या निःशुल्क कोव्हिड टेस्टिंग केंद्रावर

Nagpur Covid Update :  नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी चाचण्या वाढविण्यावर मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे भर देण्यात येत आहे. पुढील धोका टाळण्यासाठी नागरिकांनी थोडेही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील मनपाच्या चाचणी केंद्रात जाउन नि:शुल्क कोरोना चाचणी करून घ्यावी आणि ज्यांचे अद्यापही लसीकरण पूर्ण झालेले नाही त्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेउन सुरक्षित व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

 नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सध्या ३६ केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे. नागपूर शहरात बाहेरून प्रवास करून येत असलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या संपर्कातील लोकांची सुद्धा त्वरीत चाचणी करण्याचे निर्देशही आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. शहरात सध्या दररोज 2 ते 3 कोरोना बाधितांची नोंद होत आहे. सध्यस्थितीत परिस्थिती आटोक्यात असली तरी मनपाची आरोग्य यंत्रणा सजज असून कोरोना नियंत्रणासाठी सर्वस्तरातून प्रयत्न केले जात आहेत.

मनपा आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देत नागरिकांना आपले लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या नागपुरात 99 टक्के पेक्षा जास्त नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस आणि 79 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत पण अजूनही डोस घेतलेला नाही त्यांनी लवकरात लवकर आपला दुसरा डोस घेउन आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

शहरात 18 वर्षावरील वयोगटात 104 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून 84 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 15 ते 17 वर्ष वयोगटातील 66 टक्के पात्र व्यक्तींनी पहिला डोस घेतला असून 50 टक्के यांनी दुसरा डोस घेतला आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटामध्ये 39 टक्के मुलांनी पहिला आणि 16 टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. नागपुरात लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या 21,89,025 असून पहिला डोस 21,71,396 नागरिकांनी आणि 17,32,454 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पात्र नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
 
मनपाचे निःशुल्क अँटीजेन व आरटीपीसीआर कोरोना चाचणी केंद्र
 
लक्ष्मीनगरमध्ये आरपीटीएस पोलिस प्रशिक्षण केंद्र, जेरिल लॉन जवळ, जयताळा परिसरात यूपीएचसी हमुमान मंदिर, मनपा शाळेजवळ, कामगार नगर यूपीएचसी सुभाष नगर बुद्ध विहार, धरमपेठ झोन अंतर्गत तेलंखेडी यूपीएचसी, रामनगर आयुर्वेदिक हॉस्पीटल ,मनपा हिंदी प्राथमिक शाळेजवळ, हजारीपहाड यूपीएचसी वार्ड क्र. 67 वाचनालय, सदर रोगनिदान केंद्र कॅनरा बँकेच्या समोर, फुटाळा यूपीएचसी, अमरावती रोड, गल्ली नं. 3, मनपा शाळे समोर, हनुमान नगर हुडकेश्वर यूपीएचसी, शिवाजी कॉलनी, नासरे सभागृहाजवळ, मानेवाडा यूपीएचसी, व्हॉलिबॉल मैदान, ओंकार नगर, धंतोली कॉटन मार्केट यूपीएचसी, संत्रा मार्केट जवळ, बाबुलखेडा यूपीएचसी मानवता हायस्कूल, नेहरूनगर नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी, गजानन महाराज मंदिर जवळ, बिडीपेठ यूपीएचसी शिव मंदिर जवळ, त्रिकोणी मैदान, ताजबाग हेल्थ पोस्ट, रुबी ट्रेनिंग सेंटर ताज बाग, दिघोरी हेल्थ पोस्ट समाज भवन, दिघोरी दहन घाटाजवळ, गांधीबाग मोमीनपूरा यूपीएचसी, कचरा टब जवळ, मोमीनपूरा डीएड कॉलेजला लागून, स्व. प्रकारराव दटके महाल रोगनिदान केंद्र, कोतवाली पोलिस चौकी जवळ, भालदारपूरा यूपीएचसी मनपा अग्निशमन केंद्र, मनपा उर्दू शाळेजवळ, गंजीपेठ, भालदारपूरा, नेताजी दवाखाना गोळीबार चौक, पाटवी गल्ली, सतरंजीपुरा शांती नगर यूपीएचसी, मुदलीयार चौक, मेहंदीबाग यूपीएचसी लिगल सेलिब्रेशन रोड, देवतारे चौक, राष्ट्रसंत तुकडोजी हॉल, मेहंदीबाग रोड, कुंदनलाल गुप्ता नगर हेल्थ पोस्ट पंचवटी नगर मैदान, जागनाथ बुधवारी यूपीएचसी टी.बी. हॉस्पीटल जवळ, गोळीबार चौक रोड, 
लकडगंज पारडी यूपीएचसी, सुभाष मंदिर, पारडी महाराणी लक्ष्मीबाई शाळेच्या मागे, डिप्टी सिग्नल संजय नगर शाळेजवळ, शितला माता मंदिर चौक, हिवरी नगर यूपीएचसी पॉवर हाउस जवळ, जयभिम चौक, भरतवाडा यूपीएचसी विजय नगर, भरतवाडा, आशीनगर शेंडे नगर यूपीएचसी शांती विद्या मंदिर जवळ, पाचपावली यूपीएचसी लष्करीबाग मराठी, प्राथमिक शाळा, आवळेबाबू चौक, बंदेनवाज यूपीएचसी आझाद नगर हेल्थ पोस्ट, फारूक नगर टेका, पाचपावली पोलिस क्वॉटर जवळ, मंगळवारी इंदोरा बेझनबाग नगर जवळ, झिंगाबाई टाकळी यूपीएचसी मनपा शाळा, झिंगाबाई टाकळी, जरीपटका दवाखाना जरीपटका, नारा यूपीएचसी हनुमान मंदिर जवळ, नारा, राज नगर पागलखाना, नॅशनल फायर इंजिनिअरींग कॉलेज जवळ.

इतर बातम्या

Nagpur News: मनपाच्या आवज-जावकमधील तक्रारी पडूनच!

पावसाळी इमर्जन्सी ; मनपाचे हेल्पलाईन क्रमांक सेव्ह करुन ठेवा

Nagpur Municipal Corporation Elections 2022 : नेत्यांकडे घुसखोरीशिवाय पर्याय नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 13 February 2025 : ABP MajhaHarshwardhan Sapkal :  हर्षवर्धन सपकाळ Maharashtra Congress President , नाना पटोलेंना डच्चूABP Majha Headlines : 09 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Speech : देर आए दुरुस्त आए... Rajan Salvi आज खऱ्या शिवसेनेत सामील झाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.