(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Municipal Corporation Elections 2022 : नेत्यांकडे घुसखोरीशिवाय पर्याय नाही
नागपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रभाग रचनेनुसार होणाऱ्या निवडणूकीत बहुतांश नगरसेवकांच्या जागा सेफ आहे. मात्र भाजपचे संदीप गवई, प्रमोद तभाने, अचर्ना पाठक अडचणीत असल्याचे दिसून येत आहे.
नागपूरः या वर्षी मुंबई वगळता राज्यातील महानगरपालिकांमध्ये (Nagpur Municipal Corporation Elections) प्रभाग रचनेनुसार होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नुकतीच आरक्षण सोडत झाली. या सोडतीत बहुतांश नगरसेवकांना दिलासा मिळाला असला तरी प्रभाग रचनेतील बदलामुळे अनेक नेत्यांच्या घुसखोरी शिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
माजी महापौर दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari) व माजी नगरसेवक अॅड. संजय बालपांडे एकाच प्रभागात आल्याने नेमकी कोणाची बाजू घ्यायची असा पेच भाजपापुढे आहे. शिवाय काही ठिकाणी एकाच पक्षाचे नगरसेवक एकाच प्रभागात आल्याने त्यांना स्वपक्षातच तिकिटासाठी 'फिल्डिंग' लावावी लागणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा Nagpur NMC Elections 2022 : आरक्षण सोडतीनंतर अनेकांची गोची
गिऱ्हे की पाठक?
नव्या प्रभाग रचनेत प्रभाग 18 मध्ये भाजपच्या नगरसेविका संगीता गिऱ्हे व अर्चना पाठक या दोघींमध्ये तिकीटासाठी स्पर्धा होणार असल्याचे चित्र आहे. माजीनगरसेवक प्रमोद तभाने, अर्चना पाठक यांच्या अचडणी वाढल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे भाजपचे माजी सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे, प्रकाश भोयर, कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम हजारे, सतीश होले, संदीप सहारे, मनोज सांगोळे, रमेश पुणेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे, आभा पांडे यांचाही लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुमेरियांशी कोणाचा पंगा?
शिवसेनेचे महानगर प्रमुख, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांचे कार्यक्षेत्र प्रभाग 29 व प्रभाग 49मध्ये आहे. तर परिवहन समितीचे माजी सभापती बंटी कुकडे यांचा जुना प्रभाग जोडण्यात आला आहे. तर, प्रभाग 49 मधून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष पिंटू झलके लढण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही प्रभागांत भाजप-सेना यांच्यात लढत होणार असल्याची चिन्हे आहेत.
वाचा राज्यसभा उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजी, आशिष देशमुख काँग्रेस प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा देणार
अनेकांचा मार्ग मोकळा
मनपातील 156 जागांपैकी 78 जागा महिलांसाठी राखीव आहे. तरी तीन सदस्यीय प्रभागात एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने अनेकांना तारले आहे. मात्र एकाच जागेसाठी अनेक इच्छुक असल्याने उमेदवारीसाठी आपल्या नेत्यांच्या फिल्डिंग लावणे सुरु केली आहे.