Nagpur 24 hours helpline : पावसाळी इमर्जन्सी ; मनपाचे हेल्पलाईन क्रमांक सेव्ह करुन ठेवा
अपात्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत लवकर मदत पोहोचली जावी, वेळीच योग्य प्रकारे नोंद घ्यावी यादृष्टीने मनपाच्यावतीने 24 तास सुरु असणारे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहे. सेव्ह करुन ठेवा खालील क्रमांक.
नागपूर: पावसाळ्यातील अतिवृष्टी, त्यामुळे जीर्ण घरे पडणे, रस्त्यांवरील झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचून राहणे अशी परिस्थिती निर्माण होत असते. या सर्व आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णत: सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शहरातील दहाही झोनमध्ये 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
यांची जबाबदारी निश्चित
आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत लवकर मदत पोहोचली जावी, त्यांच्या समस्यांची वेळीच योग्य प्रकारे नोंद घ्यावी यादृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासकांच्या देखरेखीत संपूर्ण यंत्रणा कार्य करीत आहे. शहर स्तरावरील घटना प्रतिसाद प्रणालीचे ‘इंसिडेंट कमांडर’ अतिरिक्त आयुक्त (शहर) हे आहेत. या प्रणालीचे नियोजन विभागप्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना जबाबदारी देण्यात आली आहे. घटना प्रतिसाद प्रणाली अंतर्गत ऑपरेशन सेक्शन चिफ मुख्य अग्निशमन अधिकारी असून त्यांच्या नियंत्रणात रिस्पॉन्स ब्रँच हेड कार्यरत आहेत. एकूणच येणाऱ्या संभाव्य धोक्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण तयारीचे नियोजन करण्यात आले असून यासाठी विविध विभागातील कर्मचा-यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
'व्हॅट्सअॅप'वरही नोंदवा तक्रार
आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात अग्निशमन विभागाचे 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे. या नियंत्रण कक्षामध्ये अधिकारी व कर्मचारी दोन ते तीन पाळीमध्ये सेवा देत आहेत. आपात्कालीन परिस्थितीसाठी मनपा मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये 0712-2567029, 07122567777 किंवा अग्निशमन केंद्रामध्ये 0712 2540299, 07122540188 यासह 101 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल. याशिवाय 7030972200 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे सुद्धा आपली समस्या मांडता येणार आहे. नियंत्रण कक्षात प्राप्त होत असलेल्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्यासाठी काही अधिकारी व अभियंत्यांना नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मदतकार्यात सुसूत्रता यावी यासाठी अधिकारी व अभियंत्यांना कार्यासाठी ठराविक दिवस जबाबदारी दिली गेली आहे.
हे आहेत नियंत्रण कक्ष प्रमुख
कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण (1 जून ते 10 जून)
कार्यकारी अभियंता पंकज पाराशर (11 जून ते 20 जून)
कार्यकारी अभियंता अजय पझारे (21 जून ते 30 जून)
कार्यकारी अभियंता विजय गुरूबक्षाणी (1 ते 10 जुलै)
कार्यकारी अभियंता मनोज सिंग (11 ते 20 जुलै)
कार्यकारी अभियंता नरेश शिंगणजोडे (21 ते 30 जुलै)
कार्यकारी अभियंता ए.एन.डहाके (31 जुलै ते 9 ऑगस्ट)
कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार (10 ते 19 ऑगस्ट)
कार्यकारी अभियंता अनिल गेडाम (20 ते 29 ऑगस्ट)
कार्यकारी अभियंता संजय माटे (30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर)
कार्यकारी अभियंता उज्वल धनविजय (9 ते 19 सप्टेंबर)
कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे (20 ते 30 सप्टेंबर)
नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून नियंत्रण प्रमुखांशी समन्वय साधण्याची जबाबदारी उपअभियंत्यांवर दिनांकनिहाय सोपविण्यात आली आहे.
याशिवाय विद्युत विभागाचे नियंत्रण म्हणून कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर व सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता प्रकाश येमदे यांची 1 जून ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रणासाठी कनिष्ठ अभियंत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा Nagpur Municipal Corporation Elections 2022 : पुरुषांच्या प्रभागांवर 'महिला राज'
झाडे कोसळ्यास!
अतिवृष्टी दरम्यान झाडे कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास झाडे व झाडांच्या फांद्यांची विल्हेवाट लावण्यासंदर्भात उद्यान अधीक्षक तथा वृक्ष अधिकारी अमोल चौरपगार (9823391762) व उद्यान पर्यवेक्षक संघदीप फुलेकर (8830160002) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. झोनस्तरावर सहायक आयुक्त व त्यांच्या अंतर्गत झोन समन्वयक कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा Nagpur News : बुधवारी मनपा केंद्रांमध्ये केवळ कोव्हिशिल्ड उपलब्ध
कोसळलेली झाडे व फांद्यांच्या विल्हेवाटीसाठी येथे संपर्क साधा
अ.क्र. झोनचे नाव सहा.आयुक्त तथा वृक्ष अधिकारी झोन समन्वयक कर्मचारी
1 लक्ष्मीनगर गणेश राठोड (9823128275) विक्रम पाठराबे (7798411678)
2 धरमपेठ प्रकाश वराडे (9823330931) संघदीप फुलेकर (8830160002)
3 हनुमाननगर प्रकाश वराडे (9823330931) तेजराम वानखेडे (7841855789)
4 धंतोली किरण बगडे (9923621374) संदीप सेलोकर (9923311923)
5 नेहरूनगर हरीश राउत (9765559842) तेजराम वानखेडे (7841855789)
6 गांधीबाग अशोक पाटील (9823159373) मयंक धुरिया (7066266097)
7 सतरंजीपुरा घनश्याम पंधरे (8600363750) अजहर इकबाल अंसारी (7020297018)
8 लकडगंज विजय हुमने (9673009102) प्रेमचंद तिमाणे (8999613809)
9 आशीनगर गणेश राठोड (9823128275) देविदास भिवगडे (9373029403)
10 मंगळवारी विजय हुमने (9673009102) विलास सोनकुसरे (9371790785)
हेही वाचा Nagpur Municipal Corporation Elections 2022 : नेत्यांकडे घुसखोरीशिवाय पर्याय नाही
झोननिहाय २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष
अ.क्र. झोनचे नाव संपर्क क्रमांक
1 लक्ष्मीनगर 2245833/2245028
2 धरमपेठ 2567056/2565589
3 हनुमाननगर 2755589
4 धंतोली 2958401/2958400
5 नेहरूनगर 2700090/2702126
6 गांधीबाग 2735599
7 सतरंजीपुरा मो. 7030577650
8 लकडगंज 2737599/2739020
9 आशीनगर 2655605/2655603
10 मंगळवारी 2596903