Earthquake In Nagpur : नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के; महिन्याभरात तिसरी घटना
Earthquake In Nagpur : भूकंपाच्या स्थितीतून अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आणि या पूर्वी क्वचितच अनुभवायला मिळालेल्या नागपूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाच्या धक्क्याची नोंद झालीय.
Earthquake In Nagpur : भूकंपाच्या (Earthquake) स्थितीतून अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आणि या पूर्वी क्वचितच अनुभवायला मिळालेल्या नागपूर शहरात (Nagpur) सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाच्या (Earthquake In Nagpur) धक्क्याची नोंद झालीय. महिनाभराच्या काळात हा तिसरा धक्का असल्याने उलटसुलट चर्चा आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारी दुपारी 2 वाजून 24 मिनिटांनी 2. 4 रिक्टर स्केलच्या भूकंपाचा सौम्य धक्का बसला, याचे केंद्र कुही होते. तर शुक्रवारी दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी 2.5 रिक्टर स्केलचा भूकंप आला होता. त्यावेळी त्याचे केंद्र पारशिवनी होते.
भूकंपाचे (Earthquake) हे धक्के अतिशय सौम्य असून, त्याची जाणीवही नागरिकांना झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे महिनाभराच्या अंतरात हा तिसरा धक्का होय. यापूर्वी 27 मार्चला अशाचप्रकारे दुपारी नागपूरजवळ हिंगणा आणि पारशिवनी भागातच दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद भूकंप विज्ञान विभागाने केली होती. तर काल दुपारी पुन्हा अशाच प्रकारे भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये चिंता पाहायला मिळत आहे.
नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाची नोंद
भूकंप (Earthquake) हे नाव जरी उच्चारले तरी अंगाचा थरकाप उडवतो. क्षणात होत्याच नव्हतं करणारे अनेक भूकंपाच्या घटना जगभरात घडत असतात. त्याची विदारक चित्र बघितले की निसर्गापुढे मनुष्य किती खुजा आहे, हे क्षणात लक्षात येतं. मात्र हाच भूकंप कधी आपल्या आजूबाजूला झाला तर? कल्पना देखील करवत नाही. मात्र, असे असले तरी उपराजधानी नागपुरात (Nagpur) काल, 4 एप्रिलला दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के (Earthquake) बसले आहेत. महिनाभराच्या अंतरात नागपुरात बसलेला हा तिसरा भूकंपाचा धक्का असल्याचे बोललं जातंय.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजून 24 मिनिटांनी या धक्क्यांची नोंद झालीय. नागपूर परिसरात 2.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आलीय. मात्र, भूकंपाची 2.4 रिश्टर स्केल श्रेणी भीतीदायक नसल्याचेही सांगण्यात आलंय. यापूर्वी 27 मार्चला अशाचप्रकारे दुपारी नागपूरजवळ हिंगणा आणि पारशिवनी भागातच दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद भूकंप विज्ञान विभागाने केली होती.
महिनाभराच्या काळात तिसरा धक्का
नागपुरलगतच्या शेजारच्या काही भागासह मध्यप्रदेश, आंध्र, तेलंगणाचा काही भाग हा भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून मोडतो. काल 4 एप्रिलच्या दुपारच्या सुमारास 2. 4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आलीय. मात्र, ही घटना धोकादायक नसून अशा प्रकारचे भूकंप होत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी, 27 मार्च रोजी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नागपूर जिल्ह्यात तीन लहान भूकंपाची नोंद केली होती. त्यावेळी हिंगणा येथील झिलपी तलावाजवळ दुपारी 2.53 वाजता 2.8 तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास कांद्रीजवळील परसोनी येथील खेडी गावातही सौम्य धक्क्यांची नोंद झाली होती. हे अतिशय सौम्य धक्के असून, त्याची जाणीवही नागरिकांना झाली नाही. मात्र, महिनाभराच्या काळात हा तिसरा धक्का असल्याने उलटसुलट चर्चा आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
इतर महत्वाच्या बातम्या