एक्स्प्लोर

सरकारच्या भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय; नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला  

Nitin Gadkari : गडकरी यांनी सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतो असे मत व्यक्त केले.

नागपूर : माझं मार्केट मी शोधलं आहे, तुमचं मार्केट तुम्ही शोधा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांनी भाजीपाला व फळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, मी स्वतः सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय असा सल्ला यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिलाय.  

नागपुरात अॅग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. विदर्भातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी संधी या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
 
स्वतःच्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी कसे प्रयत्न केले, याचे उदाहरण उपस्थितांना सांगताना गडकरी यांनी सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून तुम्हाला सांगतो असे मत व्यक्त केले. आपल्याकडे लोकांचा विश्वास सरकार आणि परमेश्वरावर खूप असतो. मात्र, लग्न झाल्यानंतर नवविवाहितांनी प्रयत्न केले नाहीत आणि परमेश्वर आणि सरकारने कितीही इच्छा व्यक्त केली तरी घरी पाळणा हलणार नाही असे गडकरी यावेळी म्हणाले. 

काय म्हणाले नितीन गडकरी?

"सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो. कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या भरवश्यावर न राहता स्वतः कृती करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्या", असा सल्ला नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.

नितीन गडकरी यांची वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी गडकरींना ओखळले जाते. त्यांच्या आजच्या वक्तव्याची देखील आता जोरदार चर्चा होत आहे.  

महत्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : रस्ते अपघातांच्या बाबतीत संवेदनशीलता गरजेची, जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील : गडकरी 

जेव्हा PM मोदींनी बांगलादेशच्या PM शेख हसीनासमोर केले नितीन गडकरींचे कौतुक आणि एकच हशा पिकला, काय म्हणाले मोदी? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीतून अजित पवार १० मिनिटांत निघून गेले #abpमाझाBopdev Ghat Case Update : सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी आपोरींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्नSambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणारPune Bopdev Ghaat : बोपदेव घाट प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Nana Patole : 'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Embed widget