जेव्हा PM मोदींनी बांगलादेशच्या PM शेख हसीनासमोर केले नितीन गडकरींचे कौतुक आणि एकच हशा पिकला, काय म्हणाले मोदी?
PM Modi Praises Nitin Gadkari : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे अचानक एकच हशा पिकला.
PM Modi Praises Nitin Gadkari : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) दोन दिवसांच्या भारत (India) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेख हसीना यांची त्यांच्या मंत्रिमंडळा सोबत ओळख करून दिली. यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे अचानक एकच हशा पिकला.
जेव्हा पंतप्रधान मोदींनी नितीन गडकरींचे कौतुक केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांची मंत्रिमंडळाशी ओळख करून दिली तेव्हा ते म्हणाले, "तुमची नेहमीच तक्रार असते की आम्हाला जेवणाच्या वेळी भेटता येत नाही. तुम्ही नितीन गडकरींनाही जेवायला बोलवा, त्यांना खाण्यापिण्याची खूप आवड आहे. तसेच ते एक उत्साही व्यक्तिमत्व आहे
काय म्हणाल्या शेख हसीना?
हे ऐकून अचानक वातावरण बदलले आणि मजेशीर वातावरण तयार झाले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही पंतप्रधानांच्या या चर्चेला उत्तर दिले. ते म्हणाले की आम्ही काल रात्री जेवलो होतो आणि भविष्यातही नक्कीच एकत्र डिनर करू
बांगलादेशच्या पंतप्रधानांचा भारत दौरा
विशेष म्हणजे बांगलादेशच्या पंतप्रधानांचा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही नेत्यांनी दहशतवाद, सीमा व्यवस्थापनामध्ये सुरक्षा सहकार्य सुरू ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सात करारांवर स्वाक्षऱ्या
परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पाणी, व्यापार, आर्थिक संबंध आणि प्रादेशिक आणि जागतिक समस्यांशी संबंधित सर्व द्विपक्षीय मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली. तीन वर्षांनंतर भारत भेटीवर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यात दहशतवादाचा मुद्दाही पुढे आला. परस्पर द्विपक्षीय सहकार्य कसे आणि कसे वाढवायचे यावर दोन्ही सर्वोच्च नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. दोन्ही देशांनी विविध क्षेत्रांशी संबंधित सात करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे आता भारत-बांगलादेश सीमेवरील कुशियारा नदीच्या पाणीबाबत दोघांमध्ये करार झाला आहे. हा करार कुशियारा नदीच्या पाणी वाटपाशी संबंधित आहे, ज्यामुळे दक्षिण आसाममधील काही भाग आणि बांगलादेशच्या सिल्हेट भागाला आता त्याचा फायदा होणार आहे.
अशा शक्तींचा एकत्रितपणे सामना करणे अत्यंत आवश्यक
दोन्ही पंतप्रधानांच्या या भेटीत वाढता दहशतवाद आणि कट्टरतावादाचा मुद्दाही पुढे आला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आम्ही दहशतवाद विरोधात सहकार्यावर भर दिला आहे. आपण दोन्ही देशांच्या परस्पर विश्वासावर आघात करणाऱ्या अशा शक्तींचा एकत्रितपणे सामना करणे अत्यंत आवश्यक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Politics : महाराष्ट्र सत्तासंघर्ष: निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
Mahanagar Palika Election 2022 : दिवाळीनंतर निवडणुकांचा बार? मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्यासाठी हालचाली