(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Azadi Ka Amrit Mahotsav : मुख्यमंत्र्यांच्याआधी उपमुख्यमंत्र्यांचे नाव, ग्रामविकास विभागाला सापडला नाही फडणवीसांचा फोटो!
बॅनरच्या खालच्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख असून फोटो नाही. त्यांच्या नावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोसह उल्लेख आहे. हे बॅनर शासनाकडून आले असल्याचे सांगितले जात आहे.
नागपूरः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. त्यात राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला प्रचार-प्रसिद्धीसाठी बॅनर पाठविले आहे. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनंतर इतर मंत्र्यांचे नाव व फोटो असणे आवश्यक आहे. परंतु या बॅनरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने प्रोटोकॉल मोडल्याची चर्चा आहे. त्याच प्रमाणे या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने केंद्र सरकारकडून देशभरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने पाठविलेल्या बॅनरवरून चांगलीच चर्चा रंगली आहे. आधीच विरोधकांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुपर पॉवर मुख्यमंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ नाममात्र असल्याची टीका सतत होत आहे.
बॅनर शासनाकडून मिळाले: प्रशासन
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत असलेल्या बॅनरवर ग्रामविकास विभागाचे नाव स्पष्ट असून 13-15 ऑगस्ट हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकविताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरविण्याची आवश्यकता नाही. ध्वजसंहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वज आपल्या सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. राष्ट्रीय ध्वज हे राष्ट्राचे एक प्रतिरूप असते. त्यामुळे नागरिकाने त्याचा सन्मान करणे गरजेचे आहे, असा संदेश दिला आहे. त्याच्या खालच्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख असून फोटो नाही. त्यांच्या नावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोसह उल्लेख आहे. हे बॅनर जिल्हा परिषदेने लावले नसून शासनाकडून आले असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले आहे.
Azadi Ka Amrit Mahotsav : कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, उच्च न्यायालयाचे निर्बंध
स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
मुंबई : ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून त्याअनुषंगाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या विक्री दालनातून राष्ट्रध्वज विकत घेतले.