एक्स्प्लोर

Maharashtra Startup : महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेची अंमलबजावणी सुक्ष्म व योग्य नियोजनाद्वारे करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

कृषी, शिक्षण, आरोग्य व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसह महिला बचत गटाच्या महिलांना यात सहभागी करावे. त्यासोबतच औद्योगिक संघटना व बँकर्सचा यात समावेश करण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

नागपूर :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्यानुषंगाने यात्रेची अंमलबजावणी सुक्ष्म व योग्य नियोजनद्वारे करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या. महाराष्ट्र राज्य (Maharashtra) नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018  अंतर्गत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यांत्रेच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. 

दूरदुष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी आर. विमला व मुख्य कार्यकारी  अधिकारी  योगेश कुंभेजकर यांचा सहभाग होता तर  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मोहित गेडाम, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक पी. टी. देवतळे, उद्योग प्रतिनिधी जीवन घिमे, गुणवंत वासनिक, शेखर गजभिये, माविमचे राजू इंगळे, उद्योग विभागाचे ए. टी. पाटील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपस्थित होते.

शासकीय आयटीआयमध्ये यात्रेचे प्रशिक्षण

17 ऑगस्ट रोजी नागपूर व नागपूर (ग्रामीण) येथे यात्रेचे प्रशिक्षण शासकीय आयटीआय व पॉलिटेक्नीकमध्ये (Govt ITI) होणार आहे तर 18 ऑगस्टला हिंगणा व कळमेश्वर तालुक्यातील शासकीय आयटीआय व पॉलिटेक्नीक मध्ये होणार आहे. त्यासोबतच खाजगी संस्थांमध्ये ही प्रशिक्षण होणार आहे. त्याचे नियोजन योग्य प्रकारे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नाविन्यतापूर्ण स्टार्टअप धोरणाच्या माध्यमातून स्टार्टअपच्या विकासाकरीता पोषक वातावरण निर्मिती करुन त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरीता इन्क्युवेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टाट्रअप्सना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टाट्रअप वीक संकल्पपनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी  ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

सर्व घटकांना सहभागी कराः कुंभेजकर

कृषी, शिक्षण, आरोग्य व उद्योग या क्षेत्रातील तज्ञांना यासाठी आमंत्रित करा. माविमने महिला बचत गटाच्या महिलांना यात सहभागी करावे. त्यासोबतच औद्योगिक संघटना व बँकर्सचा यात समावेश करण्याच्या  सूचना त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांच्या सादरीकरण स्पर्धेच्या वेळी हे तज्ञ जज म्हणून असणार आहेत. यासाठी सर्व विभागाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेची सुरुवात महाराज बागेपासून होणार आहे. त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे जाईल.  भौगोलिक परिस्थितीनूसार याचे नियोजन करुन यात्रेची यशस्वीता करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) योगेश कुंभेजकर यांनी दिल्या.

यात्रेचे वेळापत्रक

ही यात्रा 17 ते 26 पर्यंत जिल्ह्यात राहणार असून तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. 14 सप्टेंबरपर्यंत गुगल फार्म विद्यार्थ्यांना भरावयाचे आहे, असे सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी सांगितले. या यात्रेच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थ्यांना सहभागी करुन त्यांचे सहकार्य घेण्यात येणारअसल्याचे सहसंचालक पी.टी. देवतळे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar: सुप्रिया सुळेंना डिलिमिटेशनला समर्थन करायचे असेल तर खुशाल करा, मात्र काँग्रेसचे नाव पुढे करू नये; विजय वडेट्टीवारांचा सूचक इशारा, म्हणाले, मतदार संघ वाढवले, सोईनुसार...
सुप्रिया सुळेंना डिलिमिटेशनला समर्थन करायचे असेल तर खुशाल करा, मात्र काँग्रेसचे नाव पुढे करू नये; विजय वडेट्टीवारांचा सूचक इशारा, म्हणाले, मतदार संघ वाढवले, सोईनुसार तुकडे केले नाही!
Nagpur Accident: नागपुरात दहा महिन्यांत तब्बल 224 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; रात्री 9 ते 12 काळ ठरतोय सर्वाधिक धोकादायक, आता रस्ता सुरक्षा समितीकडून महत्वाचे आदेश
नागपुरात दहा महिन्यांत तब्बल 224 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; रात्री 9 ते 12 काळ ठरतोय सर्वाधिक धोकादायक, आता सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीकडून महत्वाचे आदेश
Mohan Bhagwat On Diwali: पूर्वी फटाक्यांच्या धुरामुळे किटकांचा नाश व्हायचा, आताचे फटाके केमिकलपासून तयार होतात: डॉ. मोहन भागवत
पूर्वी फटाक्यांच्या धुरामुळे किटकांचा नाश व्हायचा, आताचे फटाके केमिकलपासून तयार होतात: डॉ. मोहन भागवत
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget