एक्स्प्लोर
पती-पत्नीचा वाद मिटवायला आलेले दोन गट पोलिस ठाण्यातच भिडले
उल्हासनगरमध्ये पती-पत्नीचं भांडण मिटवायला आलेल्या दोन गटांनी पोलिस ठाण्यातच एकमेकांवर तलवारी उगारल्याचा प्रकार समोर आला आहे

उल्हासनगर : पती-पत्नीचं भांडण मिटवायला पोलिस ठाण्यात आलेले दोन गटच परस्परांना भिडल्याचं उल्हासनगरमध्ये पाहायला मिळालं. पोलिसांसमोरच एकमेकांवर चाकू आणि तलवारी उगारणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
विकास शिरसाठ आणि नेहा शिरसाठ या पती-पत्नीमध्ये वाद सुरु होते. हे वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावलं होतं.
महिला तक्रार निवारण कक्षात दोघांची बोलणी सुरु असतानाच अचानक पुन्हा वाद उफळला. दोघांसोबत आलेले आठ ते दहा जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. इतक्यावरच न थांबता त्यांनी चक्क एकमेकांवर चाकू आणि तलवारीही उगारल्या.
या प्रकारामुळे थबकलेल्या पोलिसांनी तात्काळ दोन्ही गटांना बाजूला केलं. अन्यथा पोलिस ठाण्यातच रक्ताचे पाट वाहिले असते.
या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी दोन्ही गटांच्या नऊ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन चाकू आणि तीन तलवारी जप्त केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
