एक्स्प्लोर
चेंबूरमध्ये दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर समोरासमोर

मुंबई: मुंबईतील चेंबूर येथे दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. चेंबूर स्थानकावर रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकारामुळे काही वेळ प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण होतं. पण थोड्याच वेळापूर्वी सर्व प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती समजते आहे. मात्र, यामुळे मोनोरेल काही काळ ठप्प झाली होती.
दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे मोनोरेल प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मोनोरेल प्रशासनाचं स्पष्टीकरण :
दरम्यान, एका मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दुसरी मोनो मदतीसाठी पाठवल्याचं स्पष्टीकरण एमएमआरडीएकडून देण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
