एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री प्रितीका चौहानला अटक, एनसीबीची कारवाई

प्रितीकाने स्ट्रेसमध्ये असल्यानं ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र हे ड्रग्ज फक्त स्वःतासाठीच नव्हे तर टीव्ही इंडसट्रीमधल्या तिच्या परिचितांसाठी ती ड्रग्ज घेत असल्याची माहिती एनसीबीकडे असून त्याचा तपास ते करत आहेत.

मुबंई : ड्रग्स प्रकरणात अभिनेत्रींचा आता मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. रिया चक्रवर्तीनंतर आता आणखी एका अभिनेत्रीला ड्रग्स प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आली आहे. प्रितीका चौहान असं या अभिनेत्रीचं नाव आहे. प्रितीका "संकट मोचन हनुमान" आणि "सावधान इंडिया" सारख्या सीरियलमध्ये झळकली आहे. एनसीबीच्या चौकशीमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक मॉडल्स आणि छोट्या अभिनेत्री ड्रग्ज पुरवण्याचा हा मार्ग वापरतात.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने प्रितीकाला ड्रग्स पेडलर फैजल शेखकडून ड्रग्स घेताना रंगेहात पकडलं. प्रितीका चौहान फैसल शेखकडून 99 ग्राम गांजा घेत होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला माहिती मिळाली आणि त्याच वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम तिथे पोहोचली आणि दोघांना रंगेहात पकडलं. प्रितीकाने स्ट्रेसमध्ये असल्यानं ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र हे ड्रग्ज फक्त स्वःतासाठीच नव्हे तर टीव्ही इंडसट्रीमधल्या तिच्या परिचितांसाठी ती ड्रग्ज घेत असल्याची माहिती एनसीबीकडे असून त्याचा तपास ते करत आहेत.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, काल ड्रग्स प्रकरणात एका टीव्ही अभिनेत्रीसोबत एका ड्रग्स पेडलरला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री ड्रग्स स्वत:साठी घेत होती की कुणाला पुरवत होती याच्यावर आमचा तपास सुरू आहे. येणाऱ्या दिवसात अजून काही नावं समोर येऊ शकतात. कास्टिंग काऊचनंतर ड्रग्स रॅकेटमध्ये अभिनेत्रींची नावं आता समोर येऊ लागली आहेत.

अभिनेत्री ड्रग्जच्या जाळ्यात का अडकत आहेत?

- काही वेळेला काम मिळत नाही, ज्यामुळे नैराश्येकडे वळतात आणि त्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी नशेच्या आहारी जातात. - कधी कधी तासंतास काम करावं लागतं, ज्यामुळे शरीर आणि मेंदूला आराम देण्यासाठी सुद्धा ड्रग्ज घेतलं जातं. ज्यामुळे कामाचा सर्व ताण विसरून वेगळ्यात दुनियेत त्या जातात. - कमी वेळेमध्ये मोठ्या बॅनरची काम मिळवण्यासाठी या हिरोईन ड्रग्जचा मार्ग वापरतात. बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं, त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येण्याचं ड्रेस हे माध्यम बनतं. - अमली पदार्थ घेणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल झाल्याने देखील अमली पदार्थ घेतले जातात. - इंडस्ट्रीमध्ये सोशलाईज करणं हा महत्त्वाच भाग असतो, म्हणून बड्या बड्या पार्ट्यांमध्ये ड्रग्स घेतले जातात. पण हे ड्रग्ज मिळवण इतक सोपं नसतं. याचा फायदा स्ट्रगलिंग मॉडल्स घेतात आणि काम मिळवण्यासाठी मोठ्या कलाकारांपर्यंत ड्रग्ज पोहचवण्याचं काम करतात. - अनेक बड्या अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना ड्रगचं व्यसन असते. मात्र ते थेट ड्रग पेडलरच्या संपर्कात येऊ शकत नाही, त्यामुळे अशा छोट्या कलाकारांचा वापर ड्रग्ज मागवण्यासाठी ते करतात आणि हे छोटे कलाकार या बड्या कलाकारांची आपली जवळीक वाढवण्यासाठी करतात.

सध्या सेलिब्रिटींनी अमली पदार्थ सेवन करणं किंवा बाळगणे एक ट्रेंड झाल्यामुळे देखील अभिनेत्री अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत. ड्रग्स घेण्याची सुरुवात स्वतःपासून होते, मात्र नंतर ड्रग्सचा वापर जवळीक निर्माण करण्यासाठी केला जातो. कारण ड्रग्सवर भारतात बंदी आहे. ड्रग्स हे सहज मिळत नाही ज्यामुळे ड्रग्स सप्लायरकडून ड्रग्स आणून देणारे बड्या कालाकारांच्या संपर्कात जातात आणि त्यांचे जवळचे संबंध निर्माण होतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
शेवग्याच्या वरणासाठी डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM : 3 डिसेंबर 2024: ABP MajhaMahayuti Leaders Azad Maidan:  महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित येत आझाद मैदानावर केली पाहणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
शेवग्याच्या वरणासाठी डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
Embed widget